एलआयसीच्या पॉलिसीधारकांनो लक्ष द्या, ‘या’ दोन लोकप्रिय योजना बंद

एलआयसीच्या पॉलिसीधारकांनो लक्ष द्या, ‘या’ दोन लोकप्रिय योजना बंद

नवी दिल्ली – भारतातील सर्वांत मोठ्या विमा कंपनीने महत्त्वाच्या दोन लोकप्रिय योजना बंद केल्या आहेत. जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुरन्स या दोन योजना भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीने बंद केल्या आहेत. काही अपरिहार्य कारणांमुळे या योजना बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

बुधवारी कंपनीने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी जारी केलेल्या दोन्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी आता बंद करण्यात येत आहे. या पॉलिसींची मुदत बुधवार २३ नोव्हेंबर रोजी संपली आहे. यापैकी टेक टर्म पॉलिसी ऑनलाईन विकली जात होती तर जीवन अमर पॉलिसी ऑफलाईन विकली जायची. त्यामुळे यापुढे कोणताही ग्राहक या दोन्ही पॉलिसी घेऊ शकणार नाही.

कारण काय?

जीवन अमर योजना ऑगस्ट २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तर, टेक टर्म योजना सप्टेंबर २०१९ रोजी लॉन्च करण्यात आली होती. परंतु, तीन वर्षांत या दोन्ही पॉलिसींच्या प्रीमियमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे दोन्हींच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे या योजना बंद करण्यात आल्या आहेत. तसंच, येत्या काळात या योजना नव्या बदलासह सुरू होऊ शकतील.

या योजना बंद झाल्या तरी ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. त्यांची योजना पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. फक्त नव्याने कोणाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही.

First Published on: November 24, 2022 1:56 PM
Exit mobile version