Coronavirus: ऑस्ट्रेलिया लॉकडाऊन; कालावधी वाचून म्हणाल आपले २१ दिवस बरे

Coronavirus: ऑस्ट्रेलिया लॉकडाऊन; कालावधी वाचून म्हणाल आपले २१ दिवस बरे

जगभरात करोनाचे तांडव सुरू आहे. त्यामुळे युरोपियन देशांपैकी बहुतांश देशांनी लॉक डाऊन केले आहे. यात आता ऑस्ट्रेलियाचाही समावेश झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करुन तीन दिवस झाले आहेत. या तीनच दिवसांत आपण खूप बोअर झाल्याचे अनेक भारतीय म्हणत आहेत. चोरून चोरून बाहेर फेरफटका मारून येत आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान स्कॉट मॉरिसोन यांनी तब्बल सहा महिन्यांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या तुलनेत भारताचा लॉकडाऊन हा खूपच कमी असल्याचे लक्षात येते. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा आदर राखा आणि घरीच थांबा.

ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त सर्व सेवा, उद्योग, व्यापार, शिक्षण, सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद असणार आहे. तसेच देशांतर्गत विमानसेवाही बंद असणार आहे. या दरम्यान अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अशा घटकांसाठी योग्य ती आर्थिक मदत केली जाईल. तसेच उद्योजकांना ही दिलासा मिळेल असे आर्थिक निर्णय घेतले जातील, असे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातही करोनाचे संकट ओढवले असून, हे संकट अधिक गडद होऊ लागले आहे. त्यामुळे आधीच खबरदारी म्हणून सरकारने ही लॉक डावूनची घोषणा केली आहे. दरम्यान यासाठी सरकार सर्व पूर्व तयारी केली असून नागरिकांचे हाल होणार नाही, असेही आश्वासन सरकाने दिले आहे. याआधीच सिडणीमध्ये संपूर्ण बंद करण्यात आले आहे. याशिवाय व्हिक्टोरिया, न्यू साऊथ वेल्स ही शहरही बंद करण्यात आली आहेत, या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाल्याने ऑस्ट्रेलियामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ऑस्ट्रेलियात आतापर्यंत ३ हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण विक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स येथे आढळले आहेत. सोशल डिस्टसिंग ठेवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच सोमवार पासून पब्ज, क्लब्स आणि जिममध्ये जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून पंतप्रधानांनी सहा महिन्याचा लॉकडाऊन जाहीर केला.

 

First Published on: March 27, 2020 8:51 PM
Exit mobile version