Punjab Congress : मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदर सिंग रंधावांच्या नावावर एकमत, सोनिया गांधींच्या निर्णयाची प्रतीक्षा

Punjab Congress : मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदर सिंग रंधावांच्या नावावर एकमत, सोनिया गांधींच्या निर्णयाची प्रतीक्षा

Punjab Congress : मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदर सिंग रंधावांच्या नावावर एकमत, सोनिया गांधींच्या निर्णयाची प्रतीक्षा

पंजाब मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते सुखजिंदर रंधावांच्या नावावर पंजाब काँग्रेसचे एकमत झालं आहे. दरम्यान आता अंतिम निर्णय घेण्याबाबतचा चेंडू हायकमांडकडे टोलवण्यात आला आहे.यामुळे आता सुखजिंदर रंधावा यांच्या नावावर काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी शिक्कामोर्तब करतील. सोनियागांधी यांनी रंधावा यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखवल्यास सुखजिंदर रंधावा हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदरांकडून आजच मुख्यमंत्री कोण होणार त्यांचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक चर्चा रंगल्या असून काही नावे देखील चर्चेत आहेत.

कॅप्टन अमरिंदर यांच्यानंतर आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा होण्याची शक्यता आहे. सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबमधील डेरा बाबा नानक मतदारसंघातून आमदार आहेत. तर सध्या ते पंजाब राज्य सरकारमध्ये ते मंत्री आहेत.

जाट-शीख नेत्यांमधून मुख्यमंत्री करा

काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा यांनी हिंदू मुख्यमंत्री करण्यास नकार दिला आहे. जाट-शीख नेत्यांमधून मुख्यमंत्री करण्याची मागणी रंधावा यांनी केली आहे. हिंदू नेत्या आणि काँग्रेस खासदार अंबिका सोनी यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केला होते. सोनिया गांधी यांनी अंबिका सोनी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवले होते. परंतु अंबिका सोनी यांनी नकार दिला आहे.

अंबिका सोनींचा मुख्यमंत्री पदासाठी नकार

सोनी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाबाबत होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. सोनी यांनी म्हटलं आहे की, मी स्वतः मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंदिगढमध्ये बैठका घेत आहेत. तर पर्यावेक्षक सर्व आमदारांची बैठक घेऊन पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करत आहेत. माझा विश्वास आहे की, पंजाबचा पुढील मुख्यमंत्री हा सीख असावा असे काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये शीख मुख्यमंत्री होणार नाही तर कोणार होणार, मी पक्षाचा सम्मान करते परंतु मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नाही घेऊ शकत असे अंबिका सोनी यांनी म्हटलं आहे. सध्या अंबिका सोनी दिल्लीत आहेत.


हेही वाचा : पंजाबचा मुख्यमंत्री शीख असावा, मुख्यमंत्री पदाच्या नकारानंतर अंबिका सोनींचे वक्तव्य


 

First Published on: September 19, 2021 3:50 PM
Exit mobile version