Ayodhya : सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक, 170 किलोमीटर अंतरातील रुमचे भाडे गगनाला भिडले

Ayodhya : सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक, 170 किलोमीटर अंतरातील रुमचे भाडे गगनाला भिडले

अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. देशाभरात या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण आहे, मात्र अयोध्येत रस्त्यांपासून विमानतळापर्यंत सर्वच गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी असतानाच या महिन्यासाठी अयोध्येतील सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक झाली आहेत. याशिवाय अयोध्येपासून 170 किलोमीटरच्या अंतरात असलेल्या परिसरातील म्हणजेच लखनऊ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्येही हॉटेल्सच्या मागणीत झपाट्याने वाढत होताना दिसत आहे. (Ayodhya Ram Mandir All hotels 100 percent booked room rates skyrocket within 170 km)

हेही वाचा – Ram Mandir : अपूर्ण मंदिरातील प्राणप्रतिष्ठा शास्त्राच्या विरुद्ध; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे वक्तव्य

सिग्नेट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे एमडीचे संस्थापक म्हणाले की, त्यांच्या हॉटेलमधील सर्व खोल्या या महिन्यासाठी बुक केल्या गेल्या आहेत. हॉटेलमधील खोल्यांचे सरासरी भाडे 85 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. सिग्नेट कलेक्शन केके यांनी अयोध्येतील सर्व हॉटेल्सच्या 45 टक्के खोल्या टेंपल ट्रस्टसाठी बुक केल्या आहेत. जेणेकरून व्हीआयपी लोकांना तिथे राहता येईल.

रॅडिसनने पार्क इन हॉटेलमध्ये बुकींग सुरू झाल्यानंतर 21 जानेवारीपर्यंत पूर्णपणे बुक झालेले आहे. सिग्नेट कलेक्शन केके हॉटेलच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी आगाऊ बुक करण्यात आल्या आहेत. प्रत्येक खोलीची किंमत सुमारे 85 हजार रुपये आणि त्याहूनही जास्त किमतीने बुक झाली आहे. रॅडिसनने पार्क इन हॉटेलमध्येही बुकींग सुरू झाल्यानंतर बुकिंगचा महापूर आला. विशेष म्हणजे हॉटेलने कोणत्याही सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर खोलीच्या किमती शेअर केलेल्या नाहीत, अशातही सर्व हॉटेलच्या खोल्या 21-22 जानेवारीसाठी बुक झाल्या आहेत.

हेही वाचा – Modi – Pawar Visit Solapur : एकाच दिवशी दोन मोठे नेते सोलापुरात; राजकीय वातावरण तापणार?

उत्तर प्रदेश सरकारकडून पर्यटकांच्या सोयीसाठी अॅप लाँच

राम मंदिराच्या उद्घाटनाने पर्यटनात झालेली वाढ पाहता पंतप्रधान मोदींनी नुकतेच पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यासोबतच महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सेवा सुरू झाले आहे. याशिवाय अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी उत्तर प्रदेश सरकारने एक अॅप लाँच केले आहे. होली अयोध्या असे अॅपचे नाव आहे. या अॅपवर अयोध्येत येणारे पर्यटक स्वस्त दरात स्वतःसाठी हॉटेलच्या खोल्या आणि निवासस्थान सहज बुक करू शकता. या अॅपद्वारे अयोध्येत हॉटेल बुक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखपत्राची प्रत द्यावी लागेल. यासोबतच पेइंग गेस्ट स्कीममध्ये नावनोंदणी करण्यासाठी मालकाला त्याच्या खोलीचा फोटो, व्हिडिओ, त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिलाची प्रत, अर्ज करणाऱ्या मालकाचे दोन फोटो द्यावे लागतील.

First Published on: January 16, 2024 2:11 PM
Exit mobile version