घरदेश-विदेशRam Mandir : अपूर्ण मंदिरातील प्राणप्रतिष्ठा शास्त्राच्या विरुद्ध; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे वक्तव्य

Ram Mandir : अपूर्ण मंदिरातील प्राणप्रतिष्ठा शास्त्राच्या विरुद्ध; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे वक्तव्य

Subscribe

अयोध्या : अवघ्या आठवड्याभरात (22 जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मात्र या कार्यक्रमाला चार शंकराचार्य उपस्थित नाहीत. यावर उत्तराखंडचे ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आपली भूमिका मांडली आहे. राम मंदिर अद्याप अपूर्ण आहे. असे असतानाही त्याठिकाणी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. त्यामुळे मी या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. (Ayodhya Ram Mandir Pranapratistha in the incomplete temple against Shastra Statement by Shankaracharya Avimukteswarananda)

हेही वाचा – Ram Mandir Ayodhya: अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात; ‘असे’ आहेत विधी

- Advertisement -

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, कोणतेही मंदिर हे देवाच्या शरीरासारखे असते. मंदिराचे शिखर हे देवाच्या डोळ्यांसारखे असून कलश हे मस्तक आहे. मंदिराचा ध्वज हा परमेश्वराच्या केसांसारखा आहे. देवाचे डोके आणि डोळे न ठेवता फक्त धड तयार आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे. खरंतर हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला जाणार नाही. जर मी कार्यक्रमाला गेलो तर लोक म्हणतील माझ्यासमोर शास्त्राचा भंग होत आहे. त्यामुळेच मी यावर प्रश्न उपस्थित केला होता आणि म्हटले होते की, जेव्हा मंदिर पूर्णपणे बांधले जाईल, तेव्हा अयोध्या ट्रस्टच्या लोकांनी अभिषेक कार्यक्रम आयोजित करावा.

मंदिर तयार नसतानाही प्राणप्रतिष्ठा कशी होईल?

मंदिराच्या गाभाऱ्यावर भाष्य करताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, मंदिराचा गाभारा हा आईच्या गर्भाप्रमाणे असतो. गाभारा तयार झाला म्हणजे गर्भाशय तयार झाले. पण त्यातला देव समोर कसा येणार? त्यासाठी 9 महिने लागतात. त्यानंतर देवाचं दर्शन होते. शरीर पूर्ण झालेले नाही. मंदिराला शरीराचं रुपच धर्मात दिलेले आहे. ते दिलेलं नसताना प्राणप्रतिष्ठा कशी होईल? असा सवाल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Raut vs Fadnavis : राऊतांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “मी मूर्खांच्या…”

वेदशास्त्राप्रमाणे राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा व्हावी

दरम्यान, शंकराचार्यांना हिंदू धर्मग्रंथांचे प्रमुख देवता मानले जाते. उत्तराखंड, ओडिशा, कर्नाटक आणि गुजरातच्या मठांमध्ये शंकराचार्य आहेत. या कार्यक्रमात चौघांनीही 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, दोन शंकराचार्यांनी या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ पत्रे जारी केली आहेत. यासंदर्भात माहिती देताना पुरीचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितले की, चार शंकराचार्यांमध्ये जीवन प्रतिष्ठेबाबत कोणतेही मतभेद नाहीत. प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठा आवश्यक आहे. मात्र, शास्त्राचे पालन न केल्यास नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत वेदशास्त्राप्रमाणे प्राण प्रतिष्ठा व्हावी, असे शंकराचार्य निश्चलानंद यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -