राम मंदिर भूमीपूजनाच्या मुहूर्तावर शंकराचार्यांचा आक्षेप

राम मंदिर भूमीपूजनाच्या मुहूर्तावर शंकराचार्यांचा आक्षेप

अयोध्येतील बहुप्रतिक्षीत राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला मंदिराच्या भूमीपूजनासाठी जाणार आहेत. मात्र, मंदिराच्या भूमीपूजनासाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तावर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी भूमिपूजनाची वेळ अशुभ असल्याचं म्हटलं आहे. शंकराचार्य यांनी मंदिराच्या बांधकामासाठी जनतेचं मत घ्यावं अशी मागणी केली आहे.

अयोध्येत भगवान राम यांचं भव्य मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर रामलला ट्रस्टनेही मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजनाची तारीख निश्चित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे, पण आता जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी मंदिराच्या मुहूर्ताच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी मुहूर्ताची वेळ अशुभ असल्याचं म्हटलं आहे. स्वरूपानंद सरस्वती महाराज म्हणाले की, आम्ही रामभक्त आहोत, राम मंदिर कोणीही बांधलं तरी आम्हाला आनंद होईल, पण त्यासाठी योग्य तारीख व शुभ मुहूर्त असावा.

स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी असंही म्हटलं आहं की रामलल्लाचं भव्य मंदिर सार्वजनिक पैशाने बांधायचं आहे, तेव्हा मंदिराचं मॉडेल कसं असावं याबद्दलही जनतेचं मत घेतलं पाहिजे. भगवान राम यांचे मंदिर कंबोडियातील अंकोरवाटसारखं विशाल आणि भव्य असावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी अयोध्याचे संत थेट शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराजांना आव्हान देत आहेत. ते म्हणतात की हनुमान चालीसा ते ऋग्वेद पर्यंत स्वरूपानंद सरस्वती यांना ज्ञान असल्यास येथे येऊन ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन करणं चुकीचं आहे हे सिद्ध करावं.


हेही वाचा – बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!; पगारामध्ये होणार १५ टक्क्यांनी वाढ


 

First Published on: July 23, 2020 9:43 AM
Exit mobile version