Bajaj Auto: ४९ वर्षे सेवेनंतर राहुल बजाज यांचा बजाज ऑटो अध्यक्षपदाचा राजीनामा

Bajaj Auto: ४९ वर्षे सेवेनंतर राहुल बजाज यांचा बजाज ऑटो अध्यक्षपदाचा राजीनामा

Bajaj Auto: ४९ वर्षे सेवेनंतर राहुल बजाज यांचा बजाज ऑटो अध्यक्षपदाचा राजीनामा

ज्येष्ठ दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज ऑटो कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या वयामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १९७२ पासून राहुल बजाज यांनी बजाज ऑटोचा कारभार सांभाळत होते. तब्बल ४९ वर्षे सेवा दिल्यानंतर राहुल बजाज यांनी राजीनामा दिली आहे. शुक्रवारी राहुल बजाज यांचा अध्यक्षपदाचा शेवटचा दिवस असेल. राहुल बजाज यांच्या जागी बजाज कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नीरज बजाज हे कंपनीचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. १ मे पासून बजाज ऑटो कंपनीचा सर्व कारभार नीरज बजाज यांच्या हाती असले.

गेल्या पाच दशकांपासून राहुल बजाज यांनी कंपनी आणि ग्रुपच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशातील दुचाकी आणि चारचाकी मॉडेल त्यांनी भारतातच नाही तर परदेशातही यशस्वी करुन दाखवले. राहुल बजाज यांनी त्यांच्या वयाचे कारण देऊन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी कंपनीतील सर्वांसाठी ते आदर्श आहेत. नव्या पिढीला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाव्यात यासाठी १ मे पासून पुढील ५ वर्षांसाठी राहुल बजाज यांना मानद चेअरमन पद देण्यात आले आहे.

राहुल बजाज यांचे ऑटो क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे. त्या काळात बाजारात मोठी स्पर्धा असताना त्यांनी मोटारसायकलच्या दुनियेत स्कूटरला एक दर्जा मिळवून दिला. राहुल बजाज हे राज्यसभेच सदस्य होऊन गेले आहेत. त्याचबरोबर देशातील तिसरा सर्वोच्च नागरी म्हणून त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बजाज ऑटोचा डोलारा त्यांनी फार मोठा केला. २००८ साली बजाज ऑटो कंपनीचे तीन भागात विभाजन करण्यात आले. बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह आणि एक होल्डिंग कंपनी असे विभाजन करण्यात आले.


हेही वाचा – भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं निधन

First Published on: April 30, 2021 1:50 PM
Exit mobile version