सर्वसामान्यांचं घर खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण; या कंपनीने गृहकर्जावरील व्याजदर केलं कमी

सर्वसामान्यांचं घर खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण; या कंपनीने गृहकर्जावरील व्याजदर केलं कमी

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांसाठी घर खरेदी करणे आता स्वस्त झाले आहे. खासगी क्षेत्रातील मोठी फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने गृहकर्ज स्वस्त केले आहे. गृह कर्जावरील व्याज कंपनीने ६.९० टक्के एवढे केले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बाब आहे.

बजाज हाऊसिंग ही बजाज फायनान्सची कंपनी आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने असे म्हटले आहे की, आता गृहकर्जावरील व्याजदर आता ६.९० टक्के इतके आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ज्यांना गृहकर्ज हवे आहे त्यांनी BHFL च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकता. ३.५ कोटींपर्यंत कर्ज काढू शकता, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की, व्याजदरात कपात केल्याने ग्राहकांना कमी दरात घरखरेदी करता येणार आहे. गृहकर्जासोबत दर महिन्याचा EMI देखील कमी होईल, यामुळे महिन्याचा आर्थिक बजेटला धक्का बसणार नाही. शिवाय, वेगवेगळ्या कर्जाचे व्याज दर वेगवेगळे आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जर एखाद्या ग्राहकाने १ कोटी इतके कर्ज ३० वर्षांसाठी ६.९० टक्के व्याज दराने घेतले तर महिन्याला ६५,८६० रुपये इतका EMI द्यावा लागेल.

 

First Published on: November 23, 2020 3:52 PM
Exit mobile version