पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानी करीमा बलूचचा रहस्यमय मृत्यू

पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानी करीमा बलूचचा रहस्यमय मृत्यू

पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठविणारी बलूच नेत्या करीमा बलूच कॅनडामध्ये मृत सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करीमा बलूच गेल्या रविवारीपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते, तर सोमवारी तिचा मृतदेह कॅनडाच्या टोरोंटोमध्ये सापडला असून आता पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, करीमाची हत्या झाली की ती कोणत्या अपघातात बळी पडली हे स्पष्ट झाले नाही. ज्या प्रकारे करीमाने पाकिस्तानी सरकारचे गैर कृत्य, छुप्या कारवाई यांचा आंतरराष्ट्रीय जनतेसमोर पर्दाफाश केला होता. या पार्श्वभूमीवर करीमाचे निधनाची भीती नाकारता येत नाही.

दरम्यान, बलुचिस्तानातील नेत्या करीमा बलूच यांचा भारताशी चांगला संबंध आहे. करीमा पंतप्रधान मोदींना आपला भाऊ मानत होती. २०१६ मध्ये रक्षाबंधन निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला भाऊ म्हणून संबोधित करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. करीमा बलूच ‘बलूच स्टुडंट ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्षा देखील होती. यासह २०१६ मध्ये करीमा बलूचचा समावेश जगातील १०० सर्वात प्रेरणादायक आणि प्रभावशाली महिलांमध्ये होता.

मिळालेल्या माहितीनुसार, करीमा रविवारपासून बेपत्ता होती. पीडित मुलीच्या परिवाराने करीमाचा शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली होती. करीमा बलूचच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली आहे. करीमा बलूचने पाकिस्तान सोडले आणि कॅनडामध्ये आश्रय घेतला आणि तेथेच ती वास्तव्यास होती. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि सैन्याच्या तोडफोडीच्या विरोधात ती आवाज उठवायची. बलुचिस्तान चळवळ नाहिशी होण्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि सैन्यच होते, असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच करीमा बलूचच्या रहस्यमय मृत्यूमागील पाकिस्तानी एजन्सींचा हात असल्याचे म्हटले जात आहे.


“शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्याची परवानगी दिल्याने सरकारचे आभार”

First Published on: December 22, 2020 2:50 PM
Exit mobile version