Balochistan University Explosion: क्वेटाच्या बलूचिस्तान यूनिवर्सिटीजवळ मोठा स्फोट, एकाचा मृत्यू १७ जण जखमी

Balochistan University Explosion: क्वेटाच्या बलूचिस्तान यूनिवर्सिटीजवळ मोठा स्फोट, एकाचा मृत्यू १७ जण जखमी

Balochistan University Explosion: क्वेटाच्या बलूचिस्तान यूनिवर्सिटीजवळ मोठा स्फोट, एकाचा मृत्यू १७ जण जखमी

पाकिस्तानच्या क्वेटा येथील सरयाब रोडवरील बलूचिस्तान विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराबाहेर मोठा स्फोट (Balochistan University Explosion)  झाला असून या स्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्या मृत्यू झाला असून १७ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या सर्व लोकांना सिविल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानी मीडियाने याबाबत वृत्त दिले आहे. स्फोटाची माहिती मिळताच कायदे अंमलबजावणी संस्था आणि बचाव पथकाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसरात घेराव घातला असून घटनास्थळी तपास सुरू करण्यात आला आहे.

बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शाहवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वविद्यावलयाच्या गेटच्या बाहेर तैनात असलेल्या एका पोलीस ट्रकला निशाणा करण्यात आले होते. एका मोटर सायकलच्या माध्यामातून एक विस्फोटक वस्तू तिथे ठेवण्यात आली होती. या भीषण स्फोटोला जबाबदार असलेल्या लोकांना लवकरच तपास करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,असे त्यांनी म्हटले. सिविल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात १७ जण जखमी झाले असून यात १३ पोलीस अधिकारी आणि ४ नागरिकांचा समावेश आहे.

गृह मंत्री मीर जियाउल्लाह लांगोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी स्फोट झाला तेव्हा पोलीस अधिकारी विश्वविद्यालयाबाहेर प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देत होते. विद्यार्थी हल्ला करणाऱ्यांच्या निशाण्यावर होते मात्र पोलिसांची असलेल्या कडक बंदोबस्तामुळे त्यांनी पोलिसांना आपले लक्ष केले. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना टार्गेट करुन हल्ला करुन अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला,असे लांगोव यांनी म्हटले.

गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत बलूचिस्तानच्या आईजीपींकडून घटनेचा रिपोर्ट मागितला आहे. या घटनेत आपला जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.


हेही वाचा – Jammu Kashmir: वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद

First Published on: October 18, 2021 8:23 PM
Exit mobile version