Bank Union Strike : व्यवहार उरका! बँका दोन दिवस राहणार बंद, खासगीकरणाविरोधात कर्मचारी आक्रमक

Bank Union Strike : व्यवहार उरका! बँका दोन दिवस राहणार बंद, खासगीकरणाविरोधात कर्मचारी आक्रमक

बँकांच्या खासगीकरणाविरोधात देशभरातील कर्मचारी आक्रमक झाले असून या महिन्यात दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या केंद्रीय कमिटीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व बँक कर्मचारी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी संपावर जाणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. मात्र, आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे. या व्यतिरिक्त सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरूस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील काही मोजक्याच बँका केंद्र सरकार ठेवणार आहे.

यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने बँकाच्या खासगीकरणाबाबत संप पुकारला आहे. UFBU ने २३ आणि २४ फेब्रुवारीला संप पुकारणार असल्याची माहिती दिली आहे. याआधी UFBU ने १५ आणि १६ मार्च २०२१ रोजी बँकांच्या खाजगीकरणाविरोधात संप पुकारला होता. दरम्यान, हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकांच्या खाजगीकरणापूर्वी या बँका आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना घेऊ शकतात. त्यामुळे हा विषय कर्मचाऱ्यांसाठीही चिंता वाढवणारा ठरू शकतो.


हेही वाचा : ICC ODI Rankings: वनडे सामन्यातील क्रमवारीत विराट दुसऱ्या आणि रोहित तिसऱ्या स्थानी, तर पहिल्या क्रमांकावर कोणता खेळाडू?


 

First Published on: February 9, 2022 7:10 PM
Exit mobile version