घरक्रीडाICC ODI Rankings: वनडे सामन्यातील क्रमवारीत विराट दुसऱ्या आणि रोहित तिसऱ्या स्थानी,...

ICC ODI Rankings: वनडे सामन्यातील क्रमवारीत विराट दुसऱ्या आणि रोहित तिसऱ्या स्थानी, तर पहिल्या क्रमांकावर कोणता खेळाडू?

Subscribe

आयसीसीच्या वनडे सामन्यातील पुरूष क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या आठ स्थानांपर्यंत फलंदाजीच्या क्रमवारीत कोणताही बदल झालले नाहीये. तर पाकिस्तानचा फलंदाज फखर जमानने ९ व्या स्थानी आणि इंग्लंडचा जो रूटने १० व्या स्थानी झेप घेतली आहेत. त्याचप्रमाणे टीम इंडियामधून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या स्थानी आणि रोहित शर्माने तिसऱ्या स्थानी बाजी मारली आहे. परंतु येथे पुन्हा एकदा टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. कारण आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत पाकिस्तानच्या खेळाडूने पहिलं स्थान गाठलं आहे.

- Advertisement -

आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पहिलं स्थान गाठलं आहे. बाबर ८७३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली ८२८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि रोहित शर्मा ८९७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉक चौथ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने ७७९ गुणांसह पाचवं स्थान गाठलं आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे शिखर धवनला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. १३ व्या क्रमांकावरून त्यांची १४ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वनडे सामन्यांच्या क्रमवारीत सातव्या स्थानी आहे. याशिवाय टॉप-१० मध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाहीये.

- Advertisement -

दरम्यान, न्यूझीलंडचा फलंदाज ट्रेंट बोल्टने ७३७ गुणांसह पहिलं स्थान गाठलंय. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवूडने ७०९ गुणांसह बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने ७०० गुणांसह तिसरं स्थान गाठलं आहे.


हेही वाचा : Punjab Assembly Election 2022: टोल फ्री प्रवास, स्वस्त वीज ; पंजाबसाठी संयुक्त समाज मार्चाकडून जाहीरनामा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -