‘या’ बँकांनी कर्जासंदर्भात घेतले मोठे निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका

‘या’ बँकांनी कर्जासंदर्भात घेतले मोठे निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका

गेल्या काही दिवसांत देशातील तीन प्रमुख बँकांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या तीन बँकांपैकी खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा या दोन बँका आहेत, तर बँक ऑफ बडोदा सरकारी बँक (BOB) आहे. या तीन बँकांनी कर्जासंदर्भात मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा परिणाम कोट्यावधी ग्राहकांवर होणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या नवीन ग्राहकांच्या कर्जावरील जोखीम प्रीमियम वाढविला आहे. साध्या भाषेत बोलायचे झाले तर नवीन ग्राहकांना बँक ऑफ बडोदाकडून स्वस्तात कर्ज मिळणार नाही. याशिवाय बँकेने कर्जाच्या बाबतीत चांगल्या क्रेडिट स्कोअरचाही समावेश केला आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांचा चांगला क्रेडिट स्कोर आहे त्याला कमी व्याजावर अधिक कर्ज मिळेल. तर कमी क्रेडिट स्कोअरवर कर्जाचे व्याज जास्त असेल.

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या शेतांच्या छायाचित्रांचे मूल्यांकन करून बँक शेतक्यांना कर्ज देणार आहे. बँकेच्या मते, यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीची अचूक कल्पना येईल आणि कर्ज मंजूर होण्यासही कमी वेळ लागेल. हे तंत्र शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा वाढविण्यात मदत करेल. त्याचप्रमाणे अलीकडेच आयसीआयसीआय होम फायनान्सने (आयसीआयसीआय एचएफसी) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या एफडी योजनेत व्याज दर सामान्यपेक्षा जास्त मिळत आहेत.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता लागणार नाही आहे. एसबीआयसारखे कार्डलेस रोकड काढून घेण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेसाठी ग्राहकांना कोटक नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल. येथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतरच आपण कोड जनरेट करून कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता.

 

First Published on: August 28, 2020 10:46 PM
Exit mobile version