पत्नीसाठी भिकाऱ्याने घेतली 90 हजाराची गाडी, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क

पत्नीसाठी भिकाऱ्याने घेतली 90 हजाराची गाडी, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेक मुलं आणि मुली प्रमे करतात आणि प्रेमासाठी वाटेल ते करतात. मुलगा व मुलगी श्रीमंत असो वा गरीब प्रेमात विश्वास आणि एकमेकांना एकमेकांची साथ असली की, सगळी स्वप्न सहज पुर्ण होतात असे म्हटले जाते. अशाच एक अनोख्या प्रेमाची गोष्ट (Love Story) समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका भिकाऱ्याने आपल्या पत्नीसाठी तब्बल 90 हजाराची गाडी खरेदी केली आहे. संतोष असे या भिकाऱ्याचे नाव असून मुन्नी साहू त्याच्या पत्नीचे नाव आहे. सध्या मध्य प्रदेशसह संपूर्ण देशभरात यांच्या प्रेमाची चर्चा रंगली आहे. तसेच त्यांच्या या नव्या गाडीचा व्हिडीओही सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल होत आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि मुन्नी हे दोघेही मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत. संतोष हा पायाने दिव्यांग असल्याने तो ट्रायसायकलने फिरून भीक मागतो आणि पत्नी मुन्नीबाई ही त्याची मदत करते.

हिंदी भाषीक पत्रकार सुशील कौशिक यांनी यासंदर्भात व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष स्वतः ट्रायसायकलवर (tricycle) बसतो आणि त्यांची पत्नी याला धक्का देण्याचे काम करायची. बऱ्याचदा रस्ता खराब असल्याने त्यांच्या पत्नीला या ट्रायसायकलला धक्का देणे खूप कठीण जायचे. त्यामुळे पत्नीला त्रास व्हायचा.

मुन्नीबाई अनेकदा याच कारणामुळे आजारीही पडली होती. यामध्ये तिच्या उपचारासाठी बरेच पैसे खर्च झाले. त्यानंतर मुन्नीने संतोषला गाडी खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पत्नीला होणारा त्रास आणि तिच्यावरील जीवापाड प्रेमामुळे संतोषने काहीही झाले तरी पत्नीसाठी मोपेड (moped) खरेदी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर संतोषने थेट आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून 90 हजाराची गाडी दिली. आता दोघेही गाडीवरूनच भीक मागण्यासाठी जातात.

संतोष आणि मुन्नी हे दोघेही बस स्टॅण्ड, मंदीर आणि मशिदीच्या बाहेर भीक मागतात आणि दररोज जवळपास 300 ते 400 रुपये कमवतात. सोबतच दोघांना आरामात दोन वेळचे जेवणही मिळते. अशाप्रकारे ही रक्कम जमा करत संतोषने 4 वर्षात 90 हजार रूपये जमा केले आणि या शनिवारी कॅश देऊन गाडी खरेदी केली. त्याने खरेदी केलेल्या या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


हेही वाचा – Uniform Civil Code : देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत भाजपशासित राज्यांतून वातावरण निर्मिती

First Published on: May 23, 2022 4:21 PM
Exit mobile version