Bharat Biotech: जुलैमध्ये COVAXIN फेज ३ च्या संपूर्ण ट्रायल डेटा सार्वजनिक करण्यात येणार

Bharat Biotech: जुलैमध्ये COVAXIN फेज ३ च्या संपूर्ण ट्रायल डेटा सार्वजनिक करण्यात येणार

DCGI ने भारत बायोटेक लसींची एक्सपायरी डेट १२ महिन्यांपर्यंत वाढवली, स्टॉक होणार रि-लेबल

हैदराबादस्थित लस निर्माता कंपनी भारत बायोटेक सध्या तिसरा टप्पा चाचणी घेत आहे. या सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा कंपनी जुलैमध्ये प्रकाशित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर कंपनी COVAXIN लसीच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याचेही सांगितले जात आहे. हैदराबादस्थित लस निर्माता कंपनी भारत बायोटेक सध्या तिसरा टप्पा चाचणी घेत आहे. या सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा कंपनी जुलैमध्ये प्रकाशित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर कंपनी COVAXIN लसीच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याचेही सांगितले जात आहे. COVAXIN लसीच्या फेज -३ डेटा सर्वप्रथम सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडे सादर केला जाईल, त्यानंतर मेडिकल रिव्ह्यू जर्नल्समध्ये ३ महिन्यांच्या मुदतीकरता प्रकाशित केला जाणार आहे. दरम्यान, COVAXIN लसीच्या फेज -३ च्या निकालाचा संपूर्ण ट्रायल डेटा जुलै दरम्यान सार्वजनिक केला जाणार असल्याचे भारत बायोटेकने बुधवारी सांगितले.

भारत बायोटेकने या लसीच्या प्रभावीतेबद्दल असे सांगितले की, या लसीचे गुणधर्म, लसीची योग्यतेचा संदर्भ घेतात, जे वापरण्याच्या आदर्श परिस्थितीत परिभाषित लोकसंख्येमध्ये लसी दिलेल्या व्यक्तींवर फायदेशीर परिणाम करतात. भारत बायोटेकने या लसीच्या प्रभावीतेबद्दल असे सांगितले की, या लसीचे गुणधर्म, लसीची योग्यतेचा संदर्भ घेतात, जे वापरण्याच्या आदर्श परिस्थितीत परिभाषित लोकसंख्येमध्ये लसी दिलेल्या व्यक्तींवर फायदेशीर परिणाम करतात.

तसेच, या लसीच्या कार्यक्षमतेबद्दल भारत बायोटेकने असेही सांगितले जेव्हा ही कार्यक्षमता व सुरक्षिततेची बाब येते तेव्हा COVAXIN ची कार्यक्षमता डेटा एकूणच कार्यक्षमतेवर ७८ टक्के आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून १०० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने हैदराबादस्थित कंपनी भारत बायोटेकने विकसित केलेल्या COVAXIN च्या आपत्कालीन वापरास ३ जानेवारी रोजी मान्यता देण्यात आली. चाचणीच्या निकालांनंतर असे दिसून आले की ही लस ७८ टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.


First Published on: June 9, 2021 7:19 PM
Exit mobile version