घरट्रेंडिंगसावधान! कोरोनावरील उपचारांसाठी 'हे' बनावट घरगुती उपाय होतायंत व्हायरल; चुकूनही करू नका...

सावधान! कोरोनावरील उपचारांसाठी ‘हे’ बनावट घरगुती उपाय होतायंत व्हायरल; चुकूनही करू नका प्रयत्न

Subscribe

देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या ९२ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असून यावेळी १ लाख ६२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णतः नाहिसा झाला नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत, मोठ्या संख्येने लोकांना संसर्ग झाला, अशा परिस्थितीत, कोरोनावरील उपचारासाठी बनावट घरगुती उपायांसह पर्याय देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होत आहे. पीआयबीच्या Fact check पथकाने या घरगुती उपचारांचे सत्य उघड केले आहे आणि कोरोनावरील उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. असले तरी असे घरगुती उपचार कधीकधी उपयुक्त ठरण्याऐवजी हानिकारक देखील ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर…

- Advertisement -
  1. चहा पिल्याने कोरोना होता बरा?

कोरोनावर घऱच्या घरी उपाय करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक उपाय आणि घरगुती उपचार गेल्या वर्षभरापासून व्हायरल होत आहे. या पसरलेल्या अफवामध्ये असा दावा केला जात आहे की, चहा पिण्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखता येतो आणि संक्रमित व्यक्तीही लवकर बरे होते. पीआयबीच्या Fact check पथकाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. यासह ‘चहा घेतल्यास कोरोना संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो, असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत’, असेही म्हटले आहे.

2. विड्याची पानं खाल्ल्याने कोरोना होत नाही?

व्हायरल होणाऱ्या कोरोनावरील उपचारांमध्ये आणखी एक घरगुती उपायांमध्ये असा दावा केला जातोय की विड्याच्या पानांचे सेवन केल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो. यावर पीआयबीने स्पष्टीकरण असे दिले की ‘सुपारीची पाने खाल्याने कोरोना विषाणू टाळता येत नाही’.

- Advertisement -

3. काळी मिरी, आले आणि मधाचा काढा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आणखी एका दाव्यानुसार काळी मिरी, आले आणि मध कोविड -१९ चा उपचार करू शकतात. पीआयबीच्या Fact check पथकाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे, कोरोनाच्या बनावट घरगुती उपचारांपासून स्वतःला वाचवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

4. लिंबाचा रस नाकात टाकल्यास कोरोना दूर

एका दाव्यानुसार लिंबाचा रस नाकात टाकल्यास कोरोना दूर होऊ शकतो. यावर पीआयबीनेही हा दावा खोटा असल्याचे म्हटले असून असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसल्याचे सांगितले आहे.

5. काळ्या मिठासह कच्च्या कांद्याचे सेवन केल्यास रूग्ण निगेटिव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणखी एका बनावट दाव्यानुसार, काळं मिठासह कच्च्या कांद्याचे सेवन केल्यामुळे कोरोनाचे रुग्ण १५ मिनिटांत कोरोना निगेटिव्ह होतात. पीआयबीनेही हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

6. तुरटीच्या पाण्याचे सेवन केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही

दुसर्‍या बनावट दाव्यानुसार, फिटकरी, तुरटीच्या पाण्याचे सेवन केल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखता येतो आणि संक्रमित व्यक्तीला आरोग्यही मिळते. या दाव्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -