Ukraine Russia War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन पोलंड दौऱ्यावर, रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आखणार रणनीती?

Ukraine Russia War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन पोलंड दौऱ्यावर, रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आखणार रणनीती?

Ukraine Russia War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन पोलंड दौऱ्यावर, रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आखणार रणनीती?

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 26 दिवसांपासून सातत्याने युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर घातक बॉम्ब हल्ले केले आहेत. आत्तापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील शहरच्या शहर उध्वस्त झाली आहेत. यातच रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत आढावा घेण्यासाठी आणि सहकारी राष्ट्रांसोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शुक्रवारी ते वॉर्सामध्ये थांबत याठिकाणी ते अध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील.

वॉर्सा येथे जाण्यापूर्वी ते युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर चर्चा करण्याबरोबरच ते ब्रुसेल्समध्ये नाटो सहयोगी, G7 नेते आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबत बैठका घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, बायडेन नाटो आणि युरोपियन देशांशी चर्चा करून पुनित यांना युद्ध रोखण्यासाठी रणनीती तयार करतील असे म्हटले जातेय.

मानवाधिकार संकटावरही होणार चर्चा

दरम्यान बायडेन पोलंडचे राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याबरोबरचं युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांसोबत मानवाधिकार संकटात मदत करण्याबाबतही चर्चा करु शकतात. तसेच बचावात्मक कारवाईसाठी काय पाऊले उचलली पाहिजेत यावरही चर्चा होऊ शकते. मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने 24 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत 2361 नागरिकांच्या मृत्यूची नोंद केली आहे. मात्र ही संख्या अधिकही असू शकते.

बायडेन युरोपियन देशातील दौऱ्यावर म्हणाले की, हा दौरा युक्रेनियन नागरिकांचे समर्थन करण्याबरोबरचं पुतिन यांच्या युक्रेनवरील आक्रमक हल्लाविरोधात जगभरातून विरोध दर्शवण्यकरिता असणार आहे, परंतु युक्रेनमध्ये दौऱ्या करण्याची अद्याप कोणताही योजना नाही.

गेल्या महिन्यात रशियाने पूर्व सोव्हियत देशांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत पोलंडचे पंतप्रधान माटुस्ज मोराविकी, चेक आणि स्लोवेनियाईच्या पंतप्रधानांसोबत राजधानी कीव शहराला भेट दिली. तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही या महिन्यात वॉरसामध्ये डुडा यांची भेट घेतली, यावेळी दोघांनी युक्रेनवरील रशियाच्या घातक कारवाईचा निषेध केला.


Chhattisgarh Naxal : छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा गोळीबार; ३ सीआरपीएफ जवान जखमी

First Published on: March 21, 2022 3:35 PM
Exit mobile version