घरदेश-विदेशChhattisgarh Naxal : छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा गोळीबार; ३ सीआरपीएफ जवान जखमी

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा गोळीबार; ३ सीआरपीएफ जवान जखमी

Subscribe

छत्तीसगडमधील सुकमा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कॅम्पवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. या घटनेत तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली आहे. 21 मार्च रोजी चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एलमागुंडा कॅम्पजवळ सकाळी 6 च्या सुमारास माओवाद्यांच्या एका गटाने सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले, मात्र यात तीन जवान जखमी झाले आहेत.

बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवानांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय केंद्रात हलवण्यात येणार आहे. बटालियनचे हवालदार हेमंत चौधरी, बसप्पा आणि ललित बाग अशी जखमी जवानांची नावे आहेत. या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र सुरक्षा दलाकडून हल्लेखोर नक्षलवाद्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

अधिकारी सुंदरराज म्हणाले की, एलमागुंडा कॅम्पची स्थापना काही काळापूर्वी झाली आहे. चिंतागुफा पोलीस ठाण्यापासून हा कॅम्प सुमारे 12 किमी अंतरावर आहे. त्याचवेळी या कॅम्पपासून सहा किलोमीटर अंतरावर मीनपा गावात आणखी एक सीआरपीएफ कॅम्प आहे.


Qatar Airways : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाची पाकिस्तानमध्ये Emergency Landing

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -