ट्रम्प पराभूत, बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

ट्रम्प पराभूत, बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी डोनाल्ड टॅम्प यांचा पराभव करत बाजी मारली आहे. त्यामुळे बायडनच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे हा निकाल लागण्याच्या काही वेळापूर्वीच ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा ट्विटद्वारे केला होता. प्रत्यक्षात मात्र बायडन यांनी ही निवडणूक जिंकली.

हा निकाल समोर येताच जो बायडन यांनी पहिले ट्विट करत अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहचवले हा मी माझा बहुमान समजतो, असेही जो बायडन यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. जो बायडन अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत सुरुवातीला अत्यंत चुरशीची झाली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत जो बायडन यांनी आघाडी घेतली तेव्हा तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील.

First Published on: November 7, 2020 11:04 PM
Exit mobile version