नोकरदारांसाठी कामाची बातमी, ईपीएफओच्या व्याजदरांत मोठी वाढ

नोकरदारांसाठी कामाची बातमी, ईपीएफओच्या व्याजदरांत मोठी वाढ

नवी दिल्ली – नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पीएफवरील ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आर्थिक वर्षे २०२२-२३ मध्ये पीएफ खातेदारांना आता ८.१५ टक्के व्याज मिळणार आहे. इपीएफओविषयी निर्णय घेणारी सर्वोच्च असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज अर्थात सीबीटी संस्थेने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय श्रम आणि रोजकार मंत्री भूपेंद्र यादव याचे प्रमुख आहेत. या संस्थेची २७ मार्च रोजी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ईपीएओने व्याजदर कमी केले होते. २०२१-२२ मध्ये व्याजदर ८.१ टक्के होते. आता या व्यादजरात वाढ करण्यात आली असून ८.१५ टक्के करण्यात आले आहे. या व्याजदरवाढीचा फायदा सहा कोटी खातेधारकांना होणार आहे.

१९७७-७८ मध्ये ईपीएफओने व्याजदर ८ टक्के निश्चित केला होता. त्यानंतर, ८.२५ किंवा त्यापेक्षा जास्त व्याजदर राहिले आहे. मात्र, २०२१-२२ वर्षात व्याजदारत घट करण्यात आली. ४० वर्षांतील हा सर्वांत कमी दर होता. आर्थिकवर्ष २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के आणि २०१५-१६मध्ये ८.८ टक्के व्याज मिळत होतं.

सविस्तर बातमी लवकरच

 

First Published on: March 28, 2023 2:03 PM
Exit mobile version