मोठी बातमी! किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवलं

मोठी बातमी!  किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवलं

केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजजू यांना कायदामंत्री पदावरुन हटवण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे.  आता कायदेमंत्री पदाचा अतिरिक्त पदभार अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना कायदामंत्री पदावरुन हटवण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे.  आता कायदेमंत्री पदाचा अतिरिक्त पदभार अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.  आता किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे.  ( Big news Kiren Rijju was removed from the post of Union Law Minister )

किरेन रिजिजू हे अरुणाचल प्रदेशचे आहेत. गेल्या काही काळापासून ते निवृत्त न्यायमूर्तींबाबत केलेल्या टिप्पणीमुळे चर्चेत आहेत. किरेन रिजिजू यांनी कॉलेजियम व्यवस्थेबाबतही म्हटले होते की, देशात कोणीही कोणालाही चेतावणी देऊ शकत नाही. देशातील प्रत्येकजण संविधानानुसार काम करतो. याशिवाय त्यांनी काही तिखट टिप्पणीही केली होती.

( हेही वाचा: 26/11 चा आरोपी तहव्वूर राणाला करणार भारताकडे सुपूर्द; अमेरिकन कोर्टाची मंजुरी )

किरेन रिजिजू यांच्या आधी जुलै २०२१ मध्ये रविशंकर प्रसाद यांच्याकडूनही कायदा मंत्रालय हिसकावण्यात आले होते. रिजिजू हे कायदामंत्री असताना, न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून त्यांच्या न्यायव्यवस्थेशी भांडण झाल्याच्या बातम्या अनेकदा हेडलाईन्स बनल्या आहेत. सर्वोच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या कॉलेजियम पद्धतीवर रिजिजू यांनी जाहीरपणे टीका केली आहे. ही ‘अपारदर्शक’ व्यवस्था असल्याची टीका त्यांनी केली होती.

अर्जुन राम मेघवाल हे राजस्थानचे आहेत. ते भाजपच्या मोठ्या दलित चेहऱ्यांपैकी एक आहेत.  अर्जुन राम मेघवाल हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखला जातात. ते अनेकदा सायकलवरून कामावर जाताना दिसतात. राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

गेल्या जानेवारीत, दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान, किरेन रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला आणि न्यायाधीशांना निवडणूक लढवण्याची किंवा सार्वजनिक चाचणीला सामोरे जाण्याची गरज नाही, परंतु तरीही ते त्यांच्या निर्णयाने लोकांच्या नजरेत असतात. लोक तुम्हाला पाहत आहेत, तुमचा न्याय करत आहेत. तुमचे निर्णय, तुम्ही कसा न्याय करता, लोक पाहू शकतात आणि न्याय करू शकतात. तसचं ते त्यांचे मत बनवू शकतात,असं रिजिजू म्हणाले होते. भारतात लोकशाही फुलवायची असेल तर मजबूत आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था असणे आवश्यक आहे. सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यात मतभेद असू शकतात, पण वाद नाही, असेही रिजिजू म्हणाले.

First Published on: May 18, 2023 10:24 AM
Exit mobile version