बिहारचा अजून एक मांझी, डोंगर फोडून बनवला कालवा

बिहारचा अजून एक मांझी, डोंगर फोडून बनवला कालवा

बिहारचा अजून एक मांझी, डोंगर फोडून बनवला कालवा

बिहारचा माउंटेन मॅन दशरथ मांझी यांचे नाव सर्वांनीच ऐकले आहे. ज्यांनी एक हातोडा आणि छिन्नीसह ३६० फुट लांब, ३० फुट रुंद आणि २५ फूट उंच डोंगरचा भाग फोडला आणि २२ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर रस्ता बनवला होता. अशाच एका ७० वर्षीय वृद्ध लौंगी भुईया यांनी खेड्यातील शेकडो लोकांच्या अडचणींवर आपल्या कष्टाने मात केली आहे. ३० वर्षांच्या कठोर मेहनतीने डोंगर फोडून ५ किलोमीटर लांबीचा कालवा बनवला आहे. त्यांच्या या कठोर मेहनतीमुळे आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावातील लोकांचा फायदा होत आहे.

बिहारमधील गया येथील रहिवाशी लौंगी भुईया यांनी कठोर मेहनत घेऊन अनेकांसमोर एक उदाहरण मांडले आहे, जे कायम भविष्यात सर्वांच्या लक्षात ठेवले जाईल. ३० वर्ष कष्ट करून डोंगरावरून पडणाऱ्या पावसाचे पाणी गोळा करून ते गावात आणण्याचे ठरविले. दररोज त्यांनी घरातून जंगलात जाऊन कालवा बांधण्यास सुरुवात केली. कोठीलवा गावाचे रहिवाशी असलेले लौंगी भुईया हे आपला मुलगा, सून आणि पत्नीसह राहतात. भुईया यांनी सांगितले की, ‘पहिल्यांदा कुटुंबातील लोकांनी त्यांना हे काम करण्यास खूप नकार दिला. पण त्यांनी कुटुंबातील कोणत्याच सदस्याचे ऐकले नाही आणि त्यांनी कालवा खोदण्यास सुरुवात केली.’

वास्तविक या भागात पाण्याअभावी लोक फक्त मका आणि हरभरा पिकवत असत. अशा परिस्थितीत गावातील सर्व तरुणांनी चांगल्या नोकरीच्या शोधात खेड्यातून पलायन केले होते. बरेच लोकं कामाच्या शोधात खेड्यातून दूर गेले. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात असा विचार आला की, ‘इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर रोखता येऊ शकते.’ त्यांच्या कठोर मेहनतीमुळे आज कालवा तयार झाला असून या भागातील तीन गावातील तीन हजार लोकांना याचा फायदा होत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘जेव्हा त्यांना पाण्याबाबत जाणीव झाली तेव्हापासून लौंगी भुईया घरात कमी आणि जंगलामध्ये जास्त दिसले.’ दरम्यान भुईया यांचे म्हणणे आहे की, ‘जर सरकार काही मदत देऊ शकली तर शेतीसाठी ट्रॅक्टर सारख्या सुविधा मिळू शकतील आणि त्यामुळे शेतीसाठी नापीक जमीन सुपीक होऊ शकेल ज्यामुळे लोकांना खूप मदत होईल.’

भुईया यांच्या कामामुळे प्रत्येकजण प्रभावित झाले आहेत. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोपाऱ्यात घेतले जात आहे. त्यांच्या कामाबद्दल कौतुक केले जात आहे. त्यांनी ३० वर्षात पाच फूट रुंद आणि ३ फूट खोल कालवा बनवला आणि हजारो लोकांच्या अडचणी सोडवल्या.


हेही वाचा – संतापजनक! कोविड सेंटरमध्ये बाळाला मारण्याची धमकी देऊन आईवर ३ वेळा बलात्कार!


 

First Published on: September 13, 2020 2:59 PM
Exit mobile version