BioNTech कंपनी तयार करणार मलेरियावर पहिली लस

BioNTech कंपनी तयार करणार मलेरियावर पहिली लस

जगभरात कोरोनावर प्रभावी लस तयार करणारी BioNTech कंपनी आता मलेरियावर देखील लस तयार करणार आहे. (BioNTech to develop first malaria vaccine)  मलेरियावर लस तयारी करणारी ही कंपनी ठरेल. मलेरियाची लस तयार करण्यासाठी कंपनी mRNA पद्धतीचा वापर करणार आहे. जी पद्धत कोरोना लस तयार करण्यासाठी करण्यात आली होती. कंपनी २०२२ च्या शेवटपर्यत मलेरियावरील लसची क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार २०१९मध्ये जगभरात २२९ कोटी मलेरियाचे रुग्ण समोर आले. तर ४०९,००० लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला. जगभरात मलेरिया रुग्णांची वाढती संख्या हे प्रमुख कारण झाले आहे.

बायएनटेकचा हा मलेरिया प्रोजेक्ट eradicatemalaria मोहिमेचा हिस्सा असणार आहे. kENUP फाउंडेशनच्या वतीने ही मोहिम सुरु करण्यात आलीय. डासांपासून होणाऱ्या आजारांचा सामना करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेला जागतिक आरोग्य संघटना आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अन्ड प्रिवेंन्शन (Africa CDc)चा देखील पाठिंबा आहे.

बायएनटेकचे सीईओ आणि को फाउंड प्रोफेसर डॉ. उगुर साहीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळे सोबत असतील तर सायन्स आणि इनोवेशन एकत्र येईन जिवनात अनेक बदल घडू शकतात हे कोरोना महामारीच्या वेळेस समजले आहे.

कशी तयार होणार मलेरिया लस?

बायएनटेक मलेरियावर mRNA पद्धत वापरुन अशी लस तयार करणार आहे जी मलेरिया आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रचंड इम्युनिटी आणि अँटिबॉडीज तयार करु शकते. mRNA पद्धत व्हारसशी लढण्यासाठी प्रोटीन तयार करण्याचे संकेत देते ज्यामुळे आपली प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी योग्य प्रोटीन आणि अँटीबॉडीज मिळतात. डॉ. उगुर साहीन यांच्या माहितीनुसार, mRNA मेलेरियाच्या सर्वोत्तम लसीवर काम करत आहे. जी लस आजार रोकण्यासाठी मोठी मदत करणार आहे.

जगातील अनेक वैज्ञानिक मलेरियावर लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. परंतु त्यात कोणी यशस्वी होऊ शकले नाही. जगभरात मलेरियामुळे वर्षाला लाखो लोकांचे मृत्यू होत आहे. वर्षाला मलोरियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ४ लाख इतकी आहे. आफ्रिका देशातील अनेक गरिब भागातील लहान मुलांना मलेरिया आजार मोठ्या प्रमाणात होत आहे.


हेही वाचा – ऍस्ट्राझेनेका आणि फायझर लसींचा एक एक डोस घेतल्यास अँटिबॉडीजमध्ये सहापट वाढ, संशोधनातून खुलासा

First Published on: July 27, 2021 3:04 PM
Exit mobile version