BIS Scientist Application 2021: भारतीय मानक ब्यूरोमध्ये वैज्ञानिक पदांसाठी भरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

BIS Scientist Application 2021: भारतीय मानक ब्यूरोमध्ये वैज्ञानिक पदांसाठी भरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

BIS

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) मध्ये सरकारी नोकरी शोधणार्‍या इच्छुकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी. गेल्या काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards, BIS) ने साइंटिस्ट-बी (Scientist-B) या पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. याअंतर्गत एकूण 26 विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. आज 25 जून 2021 रोजी या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपणार आहे. BIS Scientist Application 2021 याच महिन्यात 5 जून 2021 रोजी सुरू झाले होते.

BIS ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, गेट परीक्षा 2019, 2020 आणि 2021 च्या आधारे सिव्हिल इंजिनियरिंग, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग, पर्यावरण इंजिनियरिंग, रसायन विज्ञान, टेक्सटाइल इंजिनियरिंग अशा एकूण २६ पदांवर ही भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये.

या पदांसाठी करता येणार अर्ज

अशी होणार उमेद्वाराची निवड

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जीएटीटी परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलविण्यात येणार असून निवड करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात. तसेच उमेदवारीची निवड झाल्यास त्याला सुरूवातीला 87,525 इतका पगार देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

इच्छुक उमेदवार ज्यांनी बीआयएस सायंटिस्ट अॅप्लिकेशन 2021 साठी अर्ज केलेला नाही ते उमेदवार ऑनलाईन अर्जाद्वारे ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावर, bis.gov.in वर अर्ज करू शकतात. www.bis.gov.in या संकेतस्थळा तुम्ही भेट देऊन ऑनलाईन अर्ज करु शकता.

First Published on: June 25, 2021 2:53 PM
Exit mobile version