सरकारच्या या निर्णयाला भाजप उमेदवाराचा विरोध; मोदींसमोर करणार आत्महत्या?

सरकारच्या या निर्णयाला भाजप उमेदवाराचा विरोध; मोदींसमोर करणार आत्महत्या?

घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करणार असल्याचं आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिलं आहे. याच आश्वासनावर भाजप निवडणूक लढवत आहे. मात्र या विधेयकाला भाजपाच्याच एका उमेदवारानं विरोध केला आहे. विधेयक लागू केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं समोरच आत्माहत्या करेन असा इशारा दिला आहे.

घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करण्याचे आश्वासन भाजपाने दिलं. पण मेघालयातील शिलाँग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सनबोर शुल्लाई यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या विरोधकाला विरोध करणार आहे. गरज पडली तर नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन. या विधेयकाला शेवटपर्यंत तयारी त्यांनी दर्शवली.

First Published on: April 12, 2019 11:05 AM
Exit mobile version