‘ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही…पण, शुद्राला…’

‘ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही…पण, शुद्राला…’

प्रज्ञा सिंह ठाकूर

भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधानावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केला. ‘ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं. कारण काय आहे, तर समजत नाही,’ असा प्रश्न प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाल आहे. मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाल्या प्रज्ञा सिंह ठाकूर?

‘क्षत्रियाला क्षत्रिय म्हटलं, तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं, तर वाईट वाटत नाही. शुद्राला शुद्र म्हटलं की, वाईट वाटतं. कारण काय आहे? तर समजू शकत नाही’, असं विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे.

ममता बॅनर्जीवर साधला निशाणा

भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना हल्ला झाला होता. या घटनेवरुन खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर निशाणा साधला आहे. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज येणार आहे. आपली सत्ता संपुष्टात येणार असल्याची जाणीव झाल्यानेच ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत,’ अशी टीका ठाकूर यांनी केली आहे.


हेही वाचा – वॉशिंग्टन डीसीमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात आंदोलन; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना


 

First Published on: December 13, 2020 1:43 PM
Exit mobile version