व्हिलचेअरवर फिरणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे गेले अनेक महिने व्हिलचेअरवर दिसणाऱ्या प्रज्ञासिंह या व्हिडीओमध्ये एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे बास्केटबॉल खेळत आहेत. यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उगारले असून अनेक महिने व्हिलचेअरवर फिरणाऱ्या साध्वी अचानक एवढ्या फिट कशा झाल्या असा सवाल केला आहे.

साध्वी प्रज्ञा गुरुवारी १ जुलै रोजी मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ येथे आल्या होत्या. येथील शक्ती नगरमध्ये बास्केटबॉल मैदानात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या आल्या होत्या. पण कार्यक्रमानंतर त्या थेट बास्केटबॉल कोर्टवर गेल्या आणि अनुभवी खेळाडूप्रमाणे बॉस्केटबॉल खेळू लागल्या. साध्वी बॉस्केटबॉल खेळत असल्याने
तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर अनेकांनी साध्वींचे बास्केटबॉल खेळतानाचे फोटो व व्हिडीओ काढले. याच व्हिडीओवरून काँग्रेसचे स्थानिक नेते नरेंद्र सलूजा यांनी साध्वींवर टि्वट करत त्यांना लक्ष्य केलं. ‘काही दिवसांपूर्वी ज्या साध्वी प्रज्ञा व्हिलचेअरच्या आधारावरच होत्या. ज्यांना धड नीट उभंही राहता येत नव्हतं. त्या अचानक एवढ्या बऱ्या कशा झाल्या की थेट बॉस्केटबॉल खेळायला लागल्या. कारण आतापर्यंत त्यांना दुखापत झाल्याने त्या चालू शकत नव्हत्या एवढंच माहित होतं. तरीही देव त्यांना नेहमी सुदृढ ठेवो अशी प्रार्थनाही सलूजा यांनी टि्वटमध्ये केली आहे.

सलूजा यांच्या या टि्वटनंतर साध्वी यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. कोर्टात जाण्यासाठी व्हिलचेअरवर जातात. यांच ऑक्सिजन लेवल ४५ वर येतं. विमनतळावरही त्या व्हिलचेअरवर येतात अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

First Published on: July 2, 2021 4:16 PM
Exit mobile version