काँग्रेस चीन आणि बीबीसीच्या बाजूने का उभी राहते? कारवाईनंतर भाजपाचा सवाल

काँग्रेस चीन आणि बीबीसीच्या बाजूने का उभी राहते? कारवाईनंतर भाजपाचा सवाल

संग्रहित छायाचित्र

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात सर्वेक्षण केले जात आहे. परंतु या कारवाईनंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाची ही कारवाई म्हणजे अघोषित आणीबाणी आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. दरम्यान याच कारवाईवर भाजपाने प्रतिक्रिया दिली असून बीबीसी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बीबीसीवर टीका केली. कायद्याचे पालन करूनच आयकर विभागाने बीबीसीच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. आज मोदी यांच्या नेतृत्वात भारताची चांगली प्रगती होत आहे. मात्र काही लोकांना हे आवडत नाहीये. असं गौरव भाटीया म्हणाले.

इंदिरा गांधी यांनीदेखील बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवण काँग्रेसने ठेवली पाहिजे. भारतात प्रत्येक संस्थेला कायद्याचे पालन करून काम करण्याची संधी दिली जाते. मात्र त्यासाठी त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा. काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी तसेच दहशतवाद्यांच्या बाजूने का उभा राहतो, असा सवाल भाजपाकडून उपस्थित करण्यात आला.

काँग्रेस आयकर विभागाकडून केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाची वाट का पाहत नाही. काँग्रेस आताच निष्कर्षापर्यंत का पोहोचत आहे? असे सवालही भाजपाने उपस्थित केले आहेत.


हेही वाचा : भारतीय लोकशाहीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, बीबीसीच्या कारवाईनंतर राऊतांची टीका


 

First Published on: February 14, 2023 8:26 PM
Exit mobile version