black fungus स्पर्शाने पसरत नाही, विविध रंगात वर्गीकरण करणे चुकीचे- आरोग्य मंत्रालय

black fungus स्पर्शाने पसरत नाही, विविध रंगात वर्गीकरण करणे चुकीचे- आरोग्य मंत्रालय

black fungus स्पर्शाने पसरत नाही, विविध रंगात वर्गीकरण करणे चुकीचे- आरोग्य मंत्रालय

देशात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वाधिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग आढळून येत आहे. परंतु हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शरारीत रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास अनेक कोरोनामुक्त रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. म्युकरमायकोसिस या आजारामुळे व्यक्तीच्या साइनल, राइनो ऑर्बिटल आणि मेंदूवर विपरित परिणाम होत आहेत. व्यक्तीच्या शरीरातील लहान आतड्यातही याचा संसर्ग होत आहे. मात्र या आजाराला वेगवेगळ्या रंगांची ओळख देणे चुकीचे असल्याचे मत केंद्रीय आरोग्य यंत्रणेने व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत एम्स रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, या फंगस इंफेक्शनला वेगवेगळ्या रंगांवरून नावे देण्याचा काहीच अर्थ नाहीय. हे इंफेक्शन स्पर्शाने पसरत नाही. परंतु नागरिकांनी साफ-सफाईवर लक्ष ठेवत गरम पाणी प्यावे. म्युकरमायकोसिसच्या संसर्गाचा इशारा देणारी लक्षणे म्हणजे डोकेदुखी, नाकातून रक्तस्राव, डोळ्याखाली सूज, चेहऱ्यामधील संवेदना कमी होणे, जर ही लक्षणे अति जोखीम असलेल्या किंवा स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये आढळली तर त्याची माहिती तातडीने डॉक्टरांना कळवली पाहिजे. असेही डॉ. गुलेरिया म्हणाले.

गुलेरिया म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या रेटमध्ये जरी वाढ होत असली तरी १२ आठवड्यांपर्यंत पोस्ट कोविड सिंड्रोम राहू शकतात. यात श्वासोच्छवासाची समस्या, खोकला, छातीत दुखणे, थकवा, सांधेदुखी, तणाव, निद्रानाश अशी तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी समुपदेशन, पुनर्वसन आणि उपचार आवश्यक असून यात योगसने देखील बर्‍यापैकी फायदेशीर ठरत आहेत. असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिसबाबत बोलताना काळी बुरशी हा शब्द न वापरणे योग्य ठरेल, कारण काळी बुरशी हा वेगळा प्रकार आहे, म्युकरमायकोसिससोबत या प्रकाराचा संबंध जोडला जाण्याचे कारण म्हणजे पांढऱ्या बुरशीच्या समूहांच्या नमुन्यांमध्ये काळे ठिपके दिसतात. म्युकरमायकोसिसची लागण झालेले ९० ते ९५ टक्के रुग्ण एकतर मधुमेही असल्याचे आणि/किंवा स्टेरॉईड घेणारे आढळले आहेत. घरी उपचार घेणारे अनेक रुग्ण जे ऑक्सिजन उपचार घेत नव्हते त्यांना सुद्धा म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे, त्यामुळे ऑक्सिजनचे उपचार आणि या आजाराचा संसर्ग यामध्ये स्पष्ट संबंध सांगता येणार नाही.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या आकडेवारीतून असे दिसते की यामध्ये बालकांचे संरक्षण झाले आणि त्यांना कमी प्रमाणात संसर्ग झाला; जरी झाला तरी प्रमाण सौम्य होते. विषाणूमध्येही बदल झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक झळ पोहोचेल असे कोणतेही संकेत नाहीत असेही एम्सचे डॉ. गुलेरिया म्हणाले.



तामिळनाडूत विमानात लावले जोडप्याचे लग्न, DGCA ने दिले चौकशीचे आदेश


 

First Published on: May 24, 2021 5:41 PM
Exit mobile version