घरदेश-विदेशतामिळनाडूत विमानात लावले जोडप्याचे लग्न, DGCA ने दिले चौकशीचे आदेश

तामिळनाडूत विमानात लावले जोडप्याचे लग्न, DGCA ने दिले चौकशीचे आदेश

Subscribe

विमान कंपनी प्रशासनाने हे विमान लग्न समारंभासाठी वापरले जाईल याची माहिती देण्यात आली नव्हती असे स्पष्ट केले.

तामिळनाडूतील दोन मोठ्या व्यावसायिकांच्या मुला- मुलीचे विमानात झालेले लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लग्नानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मी़डियावर व्हायरल होत आहेत. परंतु या लग्नामुळे स्पाईस जेट ही विमान कंपनी आता अडचणीत सापडली आहे. कारण भारतीय नागरी उड्डाण महासंचासनालयाने मोठी कारवाई केली आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA)विमानातील लग्नाच्या या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विमान कंपनीने लग्नावेळी विमानात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे तामिळनाडूत ३१ मे २०२१ पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही या लग्नात कोरोना नियम धाब्यावर बसवत अनेक जण विना मास्क आणि कुठेही सुरक्षिर अंतर न पाळत असल्याचे दिसले. तसेच लग्नसमारंभाला ५० लोकांची मर्यादा असूनही चक्क १६१ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्यात आला. त्यामुळेनागरी उड्डाण महासंचालनालयाने लग्न लावण्यात आलेल्या स्पाईस जेट विमान कंपनीवर मोठी कारवाई केली आहे.

- Advertisement -

मदुराई येथून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट या विमानात तामिळनाडूच्या व्यावसायिकांच्या मुला- मुलीचा लग्न सोहळा पार पडला. या विमानात लग्नासाठी जवळपास वधू-वराची १६० हून अधिक पाहूणे मंडळी उपस्थित होती. या लग्नानंतर विमानाने तत्तुकुडी विमानतळावर लँड केले. मदुराईमधील एका व्यक्तीने विमान लग्न लावण्यासाठी स्पाईस जेटचं चार्टर फ्लाईट बुक केलं होतं. मात्र विमान कंपनी प्रशासनाने हे विमान लग्न समारंभासाठी वापरले जाईल याची माहिती देण्यात आली नव्हती असे स्पष्ट केले.

- Advertisement -

मदुराई विमानतळाचे संचालक एस. सेंथील वलावन यांच्या माहितीनुसार, “स्पाईसजेटचं चार्टर्ड फ्लाईट काल बुक केले होते हे खरे असले तरी हे फ्लाईट हवाई प्रवासात लग्नासाठी बुक केले असल्याबाबत विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं.” DGCA ने मदुराईतल्या विमानात लग्न लावल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून यासंदर्भात विमान कंपनीकडे पूर्ण अहवाल मागवला आहे. कोरोना संबंधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही DGCA ने दिला आहे. तर दुसरीकडे, विमान कंपनीने कोरोनी संबंधीत नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -