Breaking : पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात स्फोट; १६ जणांचा मृत्यू

Breaking : पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात स्फोट; १६ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये स्फोट (सौजन्य-डॉन न्यूज)

पाकिस्तानमधील क्वेटा शहरात आज, शुक्रवारी स्फोट झाला आहे. या स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बॉम्बस्फोटाची घटना बलुचिस्तान प्रातांतील क्वेटा शहरातील हजरगंज भागात घडली आहे. हा बॉम्बस्फोट गर्दीच्या ठिकाणी झाला असून यामुळे बाजाराजवळील इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात काही लहान मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. हा बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

First Published on: April 12, 2019 11:20 AM
Exit mobile version