‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ब्लड कॅन्सरचे असू शकतात संकेत

‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ब्लड कॅन्सरचे असू शकतात संकेत

'या' लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ब्लड कॅन्सरचे असू शकतात संकेत

प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये एखाद्या रोगाचे निदान करणे खूप कठीण आहे, मुलांना त्यांच्या शरीरात होत असलेल्या बदलांची जाणीव नसते. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे, एका महिलेने सांगितले की, तिच्या मुलाला त्वचेवर खूप खाज येत होती. त्यामुळे तिने त्याला डॉक्टरांकडे नेले मात्र डॉक्टरांनी त्याला असा काही आजार सांगितला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, नेमका हा आजार काय आहे. ते आपण जाणून घेऊ….

एके दिवशी एका स्थानिक क्लबमघ्ये फुटबॉल खेळत असताना रायन थॉमसन नावाचा युवक खेळपट्टीवर खूप आळशी दिसत होता. यावेळी त्याच्या आईलाही त्याची तब्येत चांगली नसल्याचे जाणवत होते. परंतु जेव्हा रायनच्या शरीरात जी लक्षणे दिसू लागली तेव्हा तिला धक्काच बसला. स्कॉटलंडमधील फाल्किर्क येथे राहणाऱ्या रायनचे वजन अचानक खूप कमी झाले. यासोबतच त्याला शरीरावर अचानक खाज येऊ लागली, हळूहळू ही खाज त्यांच्या शरीरभर पसरली. यावेळी ऑड्रेला प्रथम वाटले की, रायनला एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असू शकते, ज्यामुळे त्याने कपडे धुण्याच्या डिटर्जेंटच्या वापरात बदल केला. यातून रायनच्या त्वचेच्या लक्षणांमध्ये कोणताही बदल झाला नाही आणि त्यांच्या लिम्फ नोड्स देखील सुजलेल्या दिसल्या.

रायनमध्ये ही लक्षणे दिसल्यानंतर ऑड्रेने त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेले, यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, तसेच रक्त तपासणी आणि सीटी स्कॅनही केले. त्यानंतर रायनला रुग्णवाहिकेद्वारे ग्लासगो येथील क्वीन एलिझाबेथ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये आणखी काही चाचण्यांसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी 54 वर्षीय ऑड्रेला सांगितले की, काळजी करू नका कारण रायनला कॅन्सर वॉर्डमध्ये नेले जात आहे. बरोबर एका आठवड्यानंतर, रायनला सांगण्यात आले की, त्याला हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा एक दुर्मिळ आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या तीनपैकी एकाला त्वचेवर खाज येते. याशिवाय वजन कमी होणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि रात्री घाम येणे ही देखील सामान्य लक्षणे आहेत. लिम्फोमाचे दोन मुख्य प्रकार आहेत – हॉजकिन लिम्फोमा आणि नॉन-हॉजकिन लिम्फोमा.

लिम्फोमा हा कोणत्या प्रकारचा लिम्फोमा आहे आणि शरीराच्या कोणत्या भागात विकसित होत आहे यावर अवलंबून आहे. ऑड्रेने सांगितले की, हा कॅन्सर रायनच्या मानेत आणि छातीत सापडला असून तो दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. डेली रेकॉर्डशी बोलताना ऑड्रेने सांगितले की, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा कॅन्सर फक्त दुसऱ्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत रायनला अजून केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीची फारशी गरज नाही. रियान त्याच्या मित्रांसोबत बाहेर जाण्यासाठी ऑगस्टपर्यंत उपचार पूर्ण होईल, अशी आशा कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

अशा परिस्थितीत ऑड्रे हॉजकिन लोकांना लिम्फोमाबद्दल जागरूक करत आहेत. ऑड्रे म्हणाली, ‘वजन कमी होणे आणि त्वचेवर खाज येणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात असे मला कधीच वाटले नव्हते. इतर पालकांनीही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये अशी माझी इच्छा आहे.

रायनचा आजार वेळेआधीच कळला होता, पण जर उशिराने माहिती मिळाली असती तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलांच्या शरीरात होणारे बदल ओळखणे महत्त्वाचे आहे. तरुणपणात मुलांच्या त्रासाबद्दल जाणून घेणे खूप कठीण आहे, कारण ते पालकांना काहीही सांगत नाहीत. पण मला माहित होते की रायनमध्ये काहीतरी चूक होत आहे.


जागतिक महिला दिन ८ मार्चलाच साजरा का केला जातो? यावर्षीची ही आहे ‘थीम’


First Published on: March 7, 2022 2:39 PM
Exit mobile version