टॉप १० श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या क्रमांकावर, अंबानी कितव्या क्रमांकावर आले? जाणून घ्या

टॉप १० श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या क्रमांकावर, अंबानी कितव्या क्रमांकावर आले? जाणून घ्या

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घसरण झाली आहे.

Bloomberg Billionaires Index: जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचं वर्चस्व कायम आहे. या यादीतील ताज्या बदलांबद्दल बोलायचं झाल्यास टॉप-१० श्रीमंत उद्योगपतींच्या यादीतून रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या क्रमांकाची घसरण झाली आहे. तर भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी सध्या चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. यापूर्वी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. पण त्यांची ही जागा अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी घेतली असल्याने अदानींची घसरण होऊन ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत ६८३ दशलक्ष डॉलरची घट झाली आहे.

त्याचबरोबर मुकेश अंबानी हे मात्र टॉप १० श्रीमंत उद्योगपतींच्या यादीतून बाहेर पडले आहेत. त्यांची संपत्ती आता १२० अब्ज डॉलरवर आली आहे. अलीकडच्या काळात भारतीय आणि आशियाई असलेले अब्जाधीश गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये चौथ्या स्थानावर घसरले आहेत. अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या वरील श्रीमंत उद्योगपतींमध्ये टेस्लाचे स्पेसएक्स आणि ट्विटरचे मालक एलोन मस्क आणि लुई व्हिटॉनचे बर्नार्ड अर्नॉल्ट हे आहेत.

First Published on: January 25, 2023 2:50 PM
Exit mobile version