BNP Recruitment 2021: सुपरवायझर, वेलफेअर ऑफिसरसह १३५ विभिन्न पदांची भरती; १ लाखापर्यंत मिळणार पगार

BNP Recruitment 2021: सुपरवायझर, वेलफेअर ऑफिसरसह १३५ विभिन्न पदांची भरती; १ लाखापर्यंत मिळणार पगार

नोकरीची सुवर्णसंधी

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक राज्यात लॉकडाऊन केले. गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कित्येक जण बेरोजगार झाले. त्यामुळे सामान्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत नोकरीची सुवर्ण संधी बँक नोट प्रेस, देवास येथे आहे. बँक नोट प्रेस, देवास (बीएनपी) यांनी वेलफेयर अधिकारी, पर्यवेक्षक (सुपरवायझर), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (जूनिअर ऑफिस असिस्टंट) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (जूनिअर टेक्नीशिअन ) या पदासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी पात्र व इच्छुक असलेले उमेदवार १२ मे ते ११ जून २०२१ या कालावधीत अधिकृत वेबसाइट bnpdewas.spmcil.com वर अर्ज करू शकतात.

बीएनपीमध्ये सुपरवायझर, वेलफेअर ऑफिसरसह १३५ विभिन्न पदांची भरती होणार असून वेलफेअर ऑफिसर या पदाकरता १ जागा, सुपरवायझर २ पद, जूनिअर ऑफिस असिस्टंट एकूण १५ पद आणि जूनिअर टेक्नीशिअन या पदाकरता ११३ पदांची जागा आहे. तर भारत सरकार Mint नोयडा येथे सेक्रेटेरिअल असिस्टंटकरता १ पद आणि जूनिअर ऑफिस असिस्टेंटकरता ३ पदांकरता ही भऱती असणार आहे. वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज १२ मे २०२१ पासून करू शकतात. हा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२१ पर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज केल्यानंतर जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्टेनोग्राफी परीक्षा आणि टायपिस्ट परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर या ऑनलाईन परीक्षा तारीख जुलै / ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे.

कोणत्या पदाकरता किती असणार पगार

कोणत्या पदाकरता किती वयाची अट

First Published on: May 10, 2021 11:43 AM
Exit mobile version