आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याने अधिकाऱ्यांसह 20 जण बेपत्ता

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याने अधिकाऱ्यांसह 20 जण बेपत्ता

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोट बुडाल्याने 20 जण बेपत्ता झाले असून, यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आसामच्या धुबरी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते. या घटनाची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने शोध कार्य आणि बचाव कार्याला सुरूवात करण्यात आली.

आसामच्या धुबरी जिल्ह्यात असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाली. या बोटीत 50 जण प्रवास करत होते. मात्र, बोट बुडाल्याने यापैकी 20 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ही अपघातग्रस्त बोट स्वदेशी बनावटीची यांत्रिक बोट आहे.

बोट उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बोटीवरील सुमारे 20 जणांपैकी 10 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, महसूल अधिकारी संजू दास यांच्यासह 10 जण अजूनही बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप कोणाचाही पत्ता लागलेला नाही.


हेही वाचा – मोठ्या गाड्यांमध्ये आता 1 ऑक्टोबरपासून सहा एअरबॅग्स अनिवार्य; नितीन गडकरींची घोषणा

First Published on: September 29, 2022 3:59 PM
Exit mobile version