घरदेश-विदेशमोठ्या गाड्यांमध्ये आता 1 ऑक्टोबरपासून सहा एअरबॅग्स अनिवार्य; नितीन गडकरींची घोषणा

मोठ्या गाड्यांमध्ये आता 1 ऑक्टोबरपासून सहा एअरबॅग्स अनिवार्य; नितीन गडकरींची घोषणा

Subscribe

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2023 पासून चार चाकी आणि मोठ्या वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की, मोटार वाहनांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे.

- Advertisement -

नितीन गडकरींनी ट्विट करत लिहिले की, ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा व्यापक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, 01 ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी कारमध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता भारतातील सर्व मोठ्या गाड्यांमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य असणार आहेत.

M-1 श्रेणीतील वाहने कोणती आहेत?

यापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 8 प्रवासी बसण्याची क्षमता असलेली आणि 3.5 टनापेक्षा कमी वजनाची सर्व वाहने M-1 च्या श्रेणीत येतात. 1 जानेवारी 2022 पासून सर्व वाहनांमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या.


सोनिया गांधींना भेटण्यासाठी अशोक गेहलोत जनपथवर; पक्षांतर्गत पेच संपवण्यावर केली चर्चा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -