पंजाब मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आढळला बॉम्ब, परिसरात उडाली खळबळ

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आढळला बॉम्ब, परिसरात उडाली खळबळ

पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्ब आढळला आहे. बॉम्बच्या वृत्ताने सर्वत्र परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. भगवंत मान यांच्या निवासस्थानावरून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या हेलिपॅडवरून चंदीगड पोलिसांनी बॉम्ब जप्त केला आहे.

चंडीमंदिरातील लष्करालाही माहिती देण्यात आली आहे. लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक येथे पोहोचले आहे. चंदीगड पोलिसांचे पथक, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा बॉम्बचा शेल राजिंद्र पार्कमधील आंब्याच्या बागेत पडून होता. हे क्षेत्र यूटीच्या अखत्यारीत येते. दुपारी काही प्रवासी येथे गेले होते. तेव्हा त्यांना बॉम्बसारखे काहीतरी दिसले. ज्याची माहिती त्यांनी पोलिसांना १०० या क्रमांकावर दिली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे चंदीगड प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथकही येथे पोहोचले आहे. आंब्याच्या बागेत या बॉम्बचा शेल पडला होता. मात्र, आता फायबर ड्रममध्ये बॉम्ब काळजीपूर्वक ठेवण्यात आला आहे. तसेच आजूबाजूला वाळूच्या पिशव्या टाकण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : ऑस्ट्रेलियात दोन हेलिकॉप्टर हवेत एकमेकांवर धडकले; चार जणांचा मृत्यू


 

First Published on: January 2, 2023 6:50 PM
Exit mobile version