Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर

Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाली म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमधून बाहेर आणलं आहे. डाऊनिंग स्ट्रीटने एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितलं की, बोरिस जॉनसन यांची प्रकृती सुधारली आहे, त्यामुळे त्यांना आयसीयूतून बाहेर आणलं आहे.

५५ वर्षीय बोरिस जॉनसन यांना रविवारी लंडनच्या सेंट थॉमस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोना विषाणूची लागण झाल्याने परिस्थिती अजून बिघडू लागल्यावर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ मार्च रोजी त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. परंतु रविवारी ५ एप्रिल रोजी त्यांना लंडनच्या सेंट थॉमस रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना ६ एप्रिल रोजी संध्याकाळी अति दक्षता विभागामध्ये (आयसीयू) पाठवण्यात आलं होतं. मात्र, जिद्दीने लढा देत बोरिस जॉनसन आयसीयूतून बाहेर आले.


हेही वाचा – चिंताजनक! भारतात आढळले ‘फॉल्स निगेटिव्ह’ कोरोना रुग्ण

पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर आल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, “मोठी बातमीः पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूमधून बाहेर आले आहेत. लवकरच बरे व्हा बोरिस !!!”

 

 

First Published on: April 10, 2020 7:41 AM
Exit mobile version