फ्रान्समध्ये २४४ वर्षापूर्वीची वाईन लिलावात

फ्रान्समध्ये २४४ वर्षापूर्वीची वाईन लिलावात

(फोटो प्रातिनिधिक आहे)

अबब…लाखोंच्या घरात वाईन

लिलावात कोणतीही गोष्ट काढली जाऊ शकते. मग ते दागिने असो किंवा एखादी गाडी असो. मात्र फ्रान्समध्ये चक्क वाईन लिलावात काढण्य़ात आल्याची अजब गोष्ट समोर आली आहे. ही वाईन तब्बल २४४ वर्षापूर्वीचे असल्याने ती चर्चेचा विषय बनली आहे. जितकी वाईन जुनी असते तितकीच त्याची किंमत देखील मौल्यवान असणार याबाबत शंकाच नाही.

लाख रुपये किंमतीची वाईन

भारतात साधारण: वाईनची किंमत ही ३५० पासून सुरु होते ती जास्तीत जास्त हजारच्या घरात. मात्र फ्रान्समध्ये अर्बोईस ‘येलो वाईन’ ही लिलावात काढली असून या एका बॉटलची किंमत ११ लाख ८१ हजार ७७० रुपये इतकी असून दुसरी वाईन ही १५ लाख ७५ हजार ६९३ रुपये किंमतीला लिलावात विकली गेली आहे. हा लिलाव लॉन्स-लेच्या शहरात करण्यात आला होता. लिलावासाठी प्रसिद्ध असणारे फिलिप एटीवन यांच्या माहितीनुसार १९९४ साली या वाईनची चव काही तज्ञ लोकांनी घेतली आणि या २४४ वर्ष जुन्या वाईनला १० पैकी ९.४ इतके गुण दिले गेले. तसेच २०११ मध्ये याच वाईनचा लिलाव तब्बल ४४ लाख ९० हजार ७२६ रुपयांना झाला होता.

First Published on: May 28, 2018 11:52 AM
Exit mobile version