ब्रह्मोसची यशस्वी चाचणी

ब्रह्मोसची यशस्वी चाचणी

ब्रह्मोस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची ओडिसातल्या बालासोर जिल्ह्यात यशस्वी चाचणी करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी ब्रह्मोसची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती संरक्षण खात्याने दिली आहे. या चाचणीमुळे आता भारताच्या लष्करी ताकदीमध्ये वाढ झाली आहे.

 

ब्रह्मोसची वैशिष्ट्ये

रात्री ११.४५ वाजता मोबाईल लाँचरवरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यानंतर क्षेपणास्त्राने अपेक्षित लक्ष्यभेद देखील केला. २.८ ते ३ मैल प्रतितास असा या क्षेपणास्त्राचा वेग आहे. ब्रह्मोसमध्ये स्वदेशी प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. यामध्ये इंधन व्यवस्थापन सारख्या प्रणालीचा समावेश असल्याची माहिती ब्रह्मोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीर मिश्रा यांनी दिली. शिवाय या चाचणीतून ब्रह्मोसची कार्यक्षमता आणि दिर्घायुष्य सिद्ध झाले.

कुणी बनवलं ब्रह्मोस?

डीआरडीओ आणि एनपीओएस यांच्या एकत्रित सहभागातून ब्रम्होसची निर्मिती करण्यात आली आहे. चाचणी झालेले ब्रह्मोस हे जगातल्या वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. यावेळी ब्रह्मोसची कार्यक्षमता किती प्रभावी आहे हे दिसून आले. चाचणी दरम्यान मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत विकसित केल्या गेलेल्या तंत्रज्ञानाची देखील चाचणी केली गेली, अशी माहिती संरक्षण खात्याने दिली आहे. ब्रम्होसच्या यशस्वी चाचणीनंतर डीआरडीओच्या अध्यक्षांनी सर्व शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक स्वागत केले.

First Published on: May 23, 2018 6:00 AM
Exit mobile version