CoronaVirus: न्यू डेव्हलपमेंट बॅंक १५ अब्ज डॉलर्स देणार, भारतासह या देशांना मिळणार मदत!

CoronaVirus: न्यू डेव्हलपमेंट बॅंक १५ अब्ज डॉलर्स देणार, भारतासह या देशांना मिळणार मदत!

CoronaVirus: न्यू डेव्हलपमेंट बॅंक १५ अब्ज डॉलर्स देणार, भारतासह या देशांना मिळणार मदत!

कोरोनाच्या संकटामुळे भारतासह अनेक देशात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँकांनीही मदतीचा हात पुढे करण्यास सुरुवात केली आहे. आता ब्रिक्स देशांनी (BRICS – ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) स्थापन केलेली न्यू डेव्हलपमेंट बॅंक (एनडीबी) आपल्या सदस्य देशांना १५ अब्ज डॉलर्सचा निधी देणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी ही माहिती दिली. न्यू डेव्हलपमेंट बॅंकच्या या निर्णयाचा फायदा भारतालाही होणार आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाला मोठा झटका बसला आहे. संपूर्ण दुनियेतील सरकार संकटातला मात करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत करणार आहोत.

यापूर्वी न्यू डेव्हलपमेंट बॅंक भारताला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. अलीकडे एडीबीचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशीही चर्चा केली आहे. एडीबी बॅक भारताला २.२ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १६,७०० कोटी रुपये) पॅकेज देणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक बँकेने भारता १ अब्ज डॉलर्स आपत्कालीन निधीस मान्यता दिली आहे.


हेही वाचा – जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर; दररोज फ्रीमध्ये मिळणार 2GB एक्स्ट्रा डेटा


 

First Published on: April 29, 2020 11:07 AM
Exit mobile version