पैसे आणि लग्नाचे दागिने घेऊन नवऱ्या मुलीनेच काढला पळ अन्…

पैसे आणि लग्नाचे दागिने घेऊन नवऱ्या मुलीनेच काढला पळ अन्…

प्रातिनिधीक फोटो

मध्य प्रदेशातील इंदूरमधील मानपूर येथे काही दिवसांपूर्वी एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला. पण आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. या युवकाचा मृत्यू हा अपघात नव्हे तर खून होता असे सांगितले जात आहे. लग्नासंदर्भातील वादात चार जणांनी त्या युवकास घराबाहेर बोलावले आणि रॉडसह लाथ-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपींनी त्याला अर्ध्या मृत अवस्थेत मानपूर घाट येथे ट्रकसमोर फेकले होते. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली असून त्यातील एक आरोपी फरार झाला आहे.

या घटनेसंदर्भात एसपी महेशचंद्र जैन यांनी सांगितले की, द्वारकापुरी येथे राहणारा दीपक वर्मा याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी मानपूर घाटात सापडला होता. सुरुवातीच्या तपासणीत असे दिसून आले की एका गाडी खाली आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान दीपकचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचे सांगितले जात आहे. यावर पोलिसांनी दीपकचा मामा मुकेश वर्माची चौकशी केली असता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मुकेश यांनी सांगितले की, त्या दिवशी लवीन मराठा, मनीष सोळंकी आणि प्रकाश जाधव यांनी मृत दीपकला सोबत नेले. या लोकांनी दीपकला भाड्याने शिव सागर कॉलनीत राहणाऱ्या शैलेश गोयल यांच्या घरी घेऊन गेले. महाराष्ट्रात राहणारे गोयल यांचा पुतणा दीपकने आपल्या मैत्रिणीशी लग्न केले होते. या घटनेमध्ये दीपकचा जोडीदार अजयही यात सहभागी होता.

असे सांगण्यात येत आहे की, यासाठी या लोकांनी लाखो रुपये घेतले होते. नंतर वधूने तेथून पैसे आणि दागिने घेऊन पळ काढला. याबाबत दीपक आणि गोयल यांचा वाद सुरू असल्याचे मामा मुकेश यांनी सांगितले. या प्रकरणात बोलण्यासाठी तिघांना नेले होते. शैलेश गोयल, लवीन, मनीष आणि प्रकाश यांनी त्याला पडद्याच्या रॉडने व लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. अर्ध मृत झाल्यावर तो ठार मेल्याचे गृहीत धरुन लवीन, मनीष दीपकला आपल्या स्कूटरवर बसवून मानपूर घाटाकडे नेले आणि तेथे येत असलेल्या भरधाव ट्रकखाली फेकले.

या हत्येच्या प्रकरणानंतर आरोपीने त्याला अपघात आहे, असा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्याने दीपकची गाडीही घटनास्थळावर फेकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर सीसीटीव्हीची चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात द्वारकापुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून स्कूटर, पडद्याची रॉड ताब्यात घेतला आहे. दरम्यान या प्रकरणात एक आरोपी शैलेश गोयल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

एसपी महेशचंद्र जैन यांनी सांगितले की मृत पावलेला दीपक आणि अजय ज्या परिवारात लग्नासाठी मुली कमी असतील तेथे त्यांची कुटुंबे शोधत असत. दीपकचे शैलेश गोयल यांच्या पुतण्याने तिच्या मैत्रिणीशी लग्न केले. जी मुलगी काही दिवसांनी दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली. जेव्हा शैलेशला हे प्रकरण समजले तेव्हा त्याने आक्षेप घेतला आणि पैसे आणि दागिने परत मिळवण्यासाठी दीपकला मारहाण केली आणि प्रकरण वाढल्यावर त्याची हत्या केली.

First Published on: November 2, 2020 3:57 PM
Exit mobile version