अखेर बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार झाले

अखेर बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार झाले

भारत संचार निगम लिमिटेड’मधील (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांचा फेब्रूवारी महिन्यातील पगार थकवला असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये झळकल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कंपनीच्या राखीव पैशांमधील ८५० कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरले जाणार असल्याची माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उर्वरीत कर्मचाऱ्यांचे पगारही लकरच मिळणार असल्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. बीएसएनएल नंतर ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’ (एमटीएनएल) च्या कर्मचाऱ्यांचाही पगार थकवला होता प्रसार माध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीस झाला.

कर्मचाऱ्यांमध्ये होती नाराजी 

केरळ, जम्मू-काश्मीर, ओडिशा आणि नवी दिल्लीतील कॉर्पोरेट कार्यालयात वेतनाचे वाटर झाले होते. उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे निधी मागण्यात आला आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी बँक खात्यात योतो. मात्र यावेळी पगार न आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. वेळेवर पगार दिला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा स्वर उमटत होते. अखेर पगार मिळाल्यावर कर्मचाऱ्यांनी समाधान मानले आहे.

First Published on: March 15, 2019 3:39 PM
Exit mobile version