Budget 2019-2020 : सोनं आणि पेट्रोल महागणार

Budget 2019-2020 : सोनं आणि पेट्रोल महागणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला आहे. पहिल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. जीएसटी अर्थव्यवस्थेची मुळे मंदावलेली गती, कृषी क्षेत्रातील विकासाची घसरण यांसह गुंतवणूकीला चालना देणे, रोजगार निर्मितीत वाढ करणे, महागाईला आळा घालणे अशी अनेक आव्हाने यंदा सरकारसमोर आहेत. नोकरदार आणि मध्यमवर्गींयांसाठी आयकराच्या मर्यादेत पुन्हा वाढ होणार का? याकडेही सामान्यांचे लक्ष आहे.
Pradnya Ghogale

• पेट्रोल आणि डिझेल महाग होणार

• सोन्यावरची कस्टम ड्युटी वाढण्याची घोषणा

• संरक्षण साहित्याच्या आयातीवर कस्टम ड्युटी नाही

Pankaj Joshi

पेट्रोल व डिझेलवर १ रुपया प्रतिलिटर रस्ते विकास कर लागणार. पेट्रोल व डिझेल महागणार

Pradnya Ghogale

• लोअर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत

• २ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना अतिरिक्त कर

Pradnya Ghogale

• जीएसटीचे दर वेळोवेळी कमी करुन लोकांना दिलासा.

• जीएसटी आणखी सोपं करण्याची घोषणा.

• अतिश्रीमंतांना अधिक टॅक्स भरावा लागणार

• २ ते ५ कोटी उत्पन्न असणाऱ्यांना ३ टक्के अतिरिक्त कर

Pradnya Ghogale

• जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे अनेक बदल झाले.

• ५ वृलाखापर्यंत उत्पन्न करमुक्त

First Published on: July 5, 2019 11:02 AM
Exit mobile version