Budget 2022: लवकरच 5G सेवा सुरू होणार, गावागावात ब्रॉडबँड सेवा उभारण्यात येणार

Budget 2022: लवकरच 5G सेवा सुरू होणार, गावागावात ब्रॉडबँड सेवा उभारण्यात येणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प २०२२ (Budget 2022) सादर केला. निर्मला सीतारामन यांनी चौथा तर मोदी सरकारने यंदा १० वा अर्थसंकल्प सादर केल्या. सलग दुसऱ्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला. यावेळी येत्या काळात टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्यात येणार असून लवकरच ५जी सेवा सुरू होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ‘येत्या काळात टेलिकॉम क्षेत्र आणि ५ जी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देणार आहेत. ५जी प्रोडक्शन मॅनेजमेंटसोबत जोडण्यासाठी एक मोठी योजना लाँच केली जात आहे. शहराप्रमाणे सर्व डिजिटल सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक सुविधा ही शहरी भागाप्रमाणेच असली पाहिजे आणि तिथेल नागारिक सुद्धा विकासासाठीच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजेत. त्यानुसार ऑप्टिकल फायबरचा सर्वत्र वापर करण्याची ही योजना आहे. त्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे. येत्या काळातही ही योजना पूर्ण होणार आहे. तसेच २०२२ मध्ये देशात ५जी सेवा सुरू होणार आहे. गावागावांमध्ये ब्रॉडबँड सुविधा उभारल्या जाणार आहेत.’

दरम्यान देशातील सर्व खासगी टेलिकॉम कंपन्या ५जीचे ट्रायल विविध शहरांमध्ये करत आहे. जिओ, एअरटेल आणि वोडफोन आयडिया तिन्ही कंपन्या मुंबई, पुणे, गुजरात, दिल्ली आणि गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये आपल्या ५जी नेटवर्कचे ट्रायल करत आहेत. रिलायन्स जिओने अलीकडे सांगितले की, ते लवकरच एक हजार शहरांमध्ये ५जी लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

 


हेही वाचा – Union Budget 2022 : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘वन क्लास वन टीव्ही चॅनल्स’ची घोषणा, अंगणवाड्यांना सक्षम बनवणार


 

First Published on: February 1, 2022 12:28 PM
Exit mobile version