Budget Session 2022 : देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Budget Session 2022 : देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Budget Session 2022 : देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारी २०२२ पासून होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांशी संवाद साधला आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फार महत्त्वाचे ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व खासदार खुल्या मनाने चर्चा करतील आणि मुक्त मनाने चर्चा होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसात खासदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संवाद साधला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सर्व खासदारांचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतासाठी अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा आहे. हे बजेट सत्र भारताची आर्थिक प्रगती, भारतात लसीकरणाचे अभियान, भारताने निर्माण केलेली लस पूर्ण जगात एक विश्वास निर्माण करत आहे. या बजेट सत्रात खासदारांशी चर्चा, चर्चेचे मुद्दे आणि खुल्या मनाने केलेली चर्चा देशासाठी महत्त्वाची ठरु शकते. मी आशा करतो की, सगळे खासदार, राजकीय पक्ष खुल्या मनाने उत्तम चर्चा करुन देशाला प्रगतीच्या रस्त्यावर नेण्यामध्ये आणि त्यात गती आणण्यासाठी मदत करतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संसदेच्या सत्रावर निवडणुकांचा परिणाम

देशातील पाच राज्यांतील निवडणुकांबाबत वक्तव्य करताना म्हणाले की, निवडणुकांमुळे सत्रांवर प्रभाव पडतो आणि चर्चेवरही परिणाम होत आहे. परंतु निवडणुका आपल्या जागी आहेत ते सुरुच राहतील. परंतु बजेट सत्र वर्षभराचा असतो त्यामुळे फार महत्त्वाचा आहे. पूर्ण प्रयत्नाने हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जेवढे फलदायी करता येईल तेवढे करु, येणारे नवीन वर्ष आपल्याला आर्थिक दृष्ट्या उंचीवर नेण्यासाठी फार मोठी संधी उपलब्ध करु शकते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटल आहे.


हेही वाचा : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, देशाच्या आर्थिक आरोग्याचे रहस्य उघडणार

First Published on: January 31, 2022 11:12 AM
Exit mobile version