Business Idea: घरबसल्या हा व्यवसाय करून करा लाखोंची कमाई, सरकारकडून 80% पर्यंत सबसिडी

Business Idea: घरबसल्या हा व्यवसाय करून करा लाखोंची कमाई, सरकारकडून 80% पर्यंत सबसिडी

beekeeping business

नवी दिल्लीः Business Idea: कोरोनाच्या संकटानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याचा कल झपाट्याने वाढलाय. तो व्यवसाय आपल्या गावातून किंवा घरातून करता आला तर याहून अधिक चांगले काय असू शकेल. तसेच या व्यवसायासाठी सरकारने 80% पर्यंत सबसिडी दिली, तर ते सोन्याहून पिवळंच ठरेल. आज आम्ही तुम्हाला तुमच्या अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, जिथे सुरुवातीच्या टप्प्यात कमी खर्च आणि बंपर कमाई करता येते. आम्ही तुम्हाला मधुमक्षिका पालन व्यवसायाबद्दल सांगत आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदतही करते. त्याचबरोबर देश-विदेशातही त्याची मागणी खूप आहे.

कमाई आणि सरकारचीही मदत

औषधांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अनेक ठिकाणी मधाचा वापर केला जातो. अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून मधमाशी पालनाला सुरुवात केली. यातून त्यांना केवळ पैसाच मिळत नाही, तर सरकार अनेक प्रकारे मदतही करते. मधमाशी पालनामध्ये कृषी आणि बागायती उत्पादन वाढवण्याची क्षमतादेखील आहे. मधमाशीपालन आणि मध प्रक्रिया युनिट उभारून प्रक्रिया प्रकल्पाच्या मदतीने मधमाशीपालनाच्या बाजारपेठेत यश मिळू शकते.

मधाशिवाय इतर अनेक उत्पादने

मधमाशीपालनातून केवळ मध किंवा मेण मिळत नाही, तर त्यापासून इतरही अनेक गोष्टी मिळतात. ते मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा बी गम, मधमाशी परागकण यांसारखी उत्पादने देतात. या सर्व उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे.

सरकारी मदतही मिळणार

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीक उत्पादकता सुधारण्यासाठी मधमाशी पालन विकास नावाची केंद्रीय योजना सुरू केली. मधमाशी पालनाचे क्षेत्र विकसित करणे, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण घेणे आणि जनजागृती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. नॅशनल बी बोर्ड (NBB) ने नाबार्डच्या सहकार्याने भारतात मधमाशी पालनासाठी आर्थिक सहाय्याच्या योजनाही सुरू केल्यात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 80 ते 85 टक्के अनुदान देते.

50 हजारांपासून सुरुवात करू शकता

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 10 खोक्यांसह देखील मधमाशी पालन करू शकता. एका पेटीत 40 किलो मध आढळल्यास एकूण मध 400 किलो होईल. 350 रुपये प्रतिकिलो दराने 400 किलो मध विकल्यास 1.40 लाख रुपये मिळतील. जर प्रति पेटीची किंमत 3500 रुपये आली तर एकूण खर्च 35,000 रुपये आणि निव्वळ नफा 1,05,000 रुपये होईल. मधमाशांची संख्या वाढल्याने हा व्यवसाय दरवर्षी 3 पटीने वाढतो. म्हणजेच 10 खोक्यांपासून सुरू केलेला व्यवसाय एका वर्षात 25 ते 30 बॉक्सपर्यंत असू शकतो. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मधमाशी पालन करायचे असेल तर तुम्ही 100 पेट्या घेऊन हे काम सुरू करू शकता. एका पेटीत 40 किलो मध आढळल्यास एकूण मध 4000 किलो होईल. 350 रुपये प्रति किलो दराने 400 किलो मध विकल्यास 14,0000000 रुपये मिळतील. प्रति बॉक्सची किंमत 3500 रुपये आली तर एकूण खर्च 3,40,000 रुपये होईल. किरकोळ आणि इतर खर्च 1,75,000 रुपये (मजुरी, प्रवास इ.) असेल. त्यामुळे निव्वळ नफा 10,15,000 रुपये होईल.

First Published on: January 10, 2022 11:37 AM
Exit mobile version