खुशखबर! उद्यापासून मोदी सरकार देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

खुशखबर! उद्यापासून मोदी सरकार देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

खुशखबर! उद्यापासून मोदी सरकार देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. तसेच काही तज्ज्ञांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण धनतेरस मुहूर्तावर केंद्र सरकार सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे. धनतेरच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे लोक या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोने ग्राहकांसाठी ही खुशखबर दिली आहे.

सध्या सोन्याच्या किंमत पाहायला झाली तर ५० हजारांहून अधिक आहे, जी सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे. पण केंद्र सरकारच्या या नव्या स्कीमद्वारे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. या स्कीममध्ये तुम्हाला सोने प्रत्यक्षरित्या खरेदी करता येणार नाही आहे. ही स्कीम उद्यापासून (९ नोव्हेंबर) सुरू होत आहे. केंद्र सरकारची ही सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम आहे. या स्कीममध्ये तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी न करता बॉन्ड खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही एक ते चार ग्रॅम इतके सोने खरेदी करू शकता. बाजारमुल्यापेक्षा या सोन्याच्या बॉन्डची किंमत कमी असते.

सोन्याची किंमत प्रतितोळा ५४,१४५ रुपये आहे. म्हणजेच ग्रॅमला ५, ४१४.५ रुपये आहे. तर मग सोन्याच्या बॉन्डची किंमत ५,१७७ प्रति ग्रॅम असणार आहे. त्यामुळे या स्कीमच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

दरम्यान यावर्षी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना ५० रुपयांची प्रति ग्रॅम सूट दिली जाणार आहे. यामुळे तुम्ही २८७ रुपयांत प्रति ग्रॅम सोने खरेदी करू शकता. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना ऑनलाईन पेमेंट करावे लागणार आहे. एका ग्रॅमच्या बॉन्डची किंमत ५२१७ रुपये असणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. तुम्हाला जर बॉन्ड खरेदी करायचा असेल तर तुम्ही बँक, बीएसई, एनएसईच्या वेबसाईटवर आणि पोस्टामध्ये जाऊन खरेदी करू शकता. ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे.

First Published on: November 8, 2020 5:31 PM
Exit mobile version