Covid-19 Caller Tune: मोबाईल युजर्सना कोरोना कॉलर ट्यूनमधून मिळणार मुक्ती, २ वर्षानंतर केंद्राचा निर्णय

Covid-19 Caller Tune: मोबाईल युजर्सना कोरोना कॉलर ट्यूनमधून मिळणार मुक्ती, २ वर्षानंतर केंद्राचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

सतत फोनवरून ऐकू येणाऱ्या कोरोना कॉलर ट्यूनला लोकं हैराण झाले आहेत. कोरोना कॉलर ट्यूनमुळे इमरजेंसीच्या काळात फोन करताना वेळ लागत आहे. या कोरोना कॉलर ट्यूनमुळे हैराण असलेल्या लोकांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. जवळपास दोन वर्षानंतर आता कोरोना कॉलर ट्यूनपासून लोकांची सुटका होणार आहे. सरकारने कोरोना कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, लवकरच फोनवर ऐकू येणारी कोरोना कॉलर ट्यून आता बंद होणार आहे. कोरोनाबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी सरकारने ही कॉलर ट्यून सुरू केली होती. आता दोन वर्षांनंतर सरकारने ही कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडच्या बादशाहाने कॉलर ट्यूनला दिला होता आवाज

सुरुवातीला कोरोना कॉलर ट्यूनला बॉलिवूडचे बादशाहा अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला होता. कॉलर ट्यूनच्या माध्यमातून बिग बींनी कोरोनापासून बचाव आणि सावध राहण्याबाबत सांगितले जात होते. त्यानंतर जसलीन भल्लाने कॉलर ट्यूनचा आवाज दिला होता.

देशात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ३१ मार्चपासून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. पण मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असणार आहे. दरम्यान देशात आज गेल्या २४ तासांत १ हजार २७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि ३१ जणांच्या मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आता कोरोनाचे सक्रीय रुग्ण १५ हजार ८५९ झाले आहेत. देशात आतापर्यंत लसीकरण १८३ कोटी पार झाले आहे.


हेही वाचा – India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 10.0 टक्क्यांनी घटली, 1270 नवे रुग्ण, 31 मृत्यू


First Published on: March 28, 2022 4:44 PM
Exit mobile version