कॅनडा सरकारने २१ ऑगस्टपर्यंत भारतीय फ्लाईट्सवर घातली बंदी

कॅनडा सरकारने २१ ऑगस्टपर्यंत भारतीय फ्लाईट्सवर घातली बंदी

Coronavirus New Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जग चिंतेत, विमान उड्डाण रोखण्याची तयारी

कॅनडा सरकारने भारतीय फ्लाईट्सवरील बंदीची मुदत ३० दिवसांनी वाढवली आहे. म्हणजेच २१ ऑगस्टपर्यंत कॅनडाने भारतीय फ्लाईट्सवर बंदी घातली आहे. २१ जुलैला भारतीय फ्लाईट्सवरील बंदीची मुदत संपणार होती, परंतु कोरोनाची दुसरी आणि कोरोना डेल्टा व्हेरियंटचे वाढते संक्रमण पाहता बंदीची मुदत वाढवण्यात आली आहे. २२ एप्रिलपासून भारतीय फ्लाईट्सवर घातलेल्या बंदीच्या मुदतीत चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याबाबत माहिती कॅनडा सरकारने दिली असून एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे.

कॅनडाच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी सांगण्यात आले की, ‘सार्वजनिक आरोग्याच्या सल्ल्यानुसार भारतीय फ्लाईट्सवरील बंदीची मुदतवाढ केली आहे. तसेच कॅनडाने थेट मार्गाने भारतातून कॅनडाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासापूर्वी कोरोना चाचणी संबंधित आवश्यकता वाढवली आहे. तसेच कॅनडातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. कॅनडा सरकारकडून देशातील प्रवासावरील निर्बंध कमी करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

लस घेतलेल्यांना कॅनडाचे दरवाजे खुले होणार 

कॅनडा सरकारने सांगितले की, देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली तर कॅनडामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कमीतकमी १४ दिवस आधी कॅनडाने मंजूर केलेल्या कोणत्याही लसीचे डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी ७ सप्टेंबरपासून आपली सीमा उघडतील. दरम्यान कोरोना लस घेतलेल्या अमेरिकन नागरिकांना ९ ऑगस्टपासून कॅनडामध्ये प्रवेश मिळणार आहे.


हेही वाचा – India Corona Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येत घट; लसीकरणाचा टप्पा ४१ कोटी पार!


First Published on: July 20, 2021 10:48 AM
Exit mobile version